एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?

Maharashtra Elections 2024: राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढला. 15 मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांचा पराभव होण्याची शक्यता.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एखाद्या निवडणुकीत मतदानाचा टक्का (Maharashtra Voting Turnout) वाढल्यास तो साधारणत: सत्तापालटाचा संकेत समजला जातो. त्यामुळे राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वाढलेले मतदान प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे नेमके काय घडणार, हे आता 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.29 टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 65 टक्क्यांच्या आसपास होती. त्यामुळे अंतिम आकडेवारीत मतदानाच्या टक्क्यात भर पडून तो 68 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात कागल मतदारसंघात सर्वाधिक 81 टक्के मतदान झाले.  अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर मुंबईत नेहमीप्रमाणे सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. मुंबईत अवघ्या 52.07 टक्के, उपनगरात 55.77 टक्के आणि ठाण्यात 56.05 टक्के मतदानाची नोंद झाली.

राज्यात सर्वाधिक मतदान झालेले टॉप 15 मतदारसंघ

करवीर - 84.01
चिमुर - 81.75
कागल - 81.72
ब्रह्मपुरी - 80.54
सिल्लोड - 80
नेवासा- 79.89
शाहूवाडी - 79.04
पलूस कडेगाव - 79.02
नवापूर - 78.70
शिराळा - 78.47
राधानगरी - 78.26
शिरोळ - 78.06
सांगोला - 77.90
दिंडोरी - 77.75
विक्रमगड - 77.75

सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघांचे विद्यमान आमदार कोण?

करवीर - काँग्रेस आमदार दिवंगत पी एन पाटील सडोलीकर 
चिमुर - कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
कागल - हसन मुश्रीफ (अजित पवार गट) 
ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिंदे गट)
नेवासा- शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष-मविआ)
शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य-महायुती)
पलूस कडेगाव - डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
नवापूर - शिरीष नाईक (काँग्रेस)
शिराळा - मानसिंग नाईक (शरद पवार)
राधानगरी - प्रकाश आबिटकर (शिंदे गट)
शिरोळ - शिवसेना आमदार
सांगोला - शहाजीबापू पाटील (शिंदे गट)
दिंडोरी - नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
विक्रमगड - सुनिल भुसारा (शरद पवार गट)

नाशिकमध्ये महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का वाढला

2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2024 निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांच्या वाढत्या मतदानाचा फायदा कोणाला असा सवाल उपस्थित होत आहे. तर पुरुषांच्या मतदानात एकूण तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.97 टक्के मतदान झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 5.37 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक 78.01 टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले.  तर सर्वात कमी 56.08 टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात 
2019 मध्ये महिलांचे मतदान 58.01 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.93 टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. महिलांच्या मतदानामध्ये यंदा 8.92 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आणखी वाचा

अजित पवार सहाव्या स्थानावर, तरीही किंगमेकर होणार? बार्गेनिंग पॉवरमुळे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार?

 महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget