एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
महायुतीच्या 160 सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (suraj chavan) यांनी व्यक्त केला.
Maharashtra vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra vidhansabha Election 2024) काल मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश भागात चांगल्या प्रकारे मतदान झाले आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंर एक्झिट पोल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, एक्झिट पोल काहीही असले तरी जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. 23 नोव्हेंबरला महायुतीच्या 160 सीट पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (suraj chavan) यांनी व्यक्त केला आहे.
काय सांगतो एक्झिट पोल?
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या 288 मतदारसंघात आज काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात 58.22 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला (Vidhansabha) मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला होता. तब्बल 42 जागांवरुन भाजप महायुती केवळ 17 जागांवर आल्याची पाहायला मिळालं. पण, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून (Exit poll) महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो, असा अंदाज आहे. 10 संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला 139 ते 156 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज
राज्यात महायुतीला 139 ते 156 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 10 संस्थांच्या सर्वेक्षणातून ही बेरीज काढण्यात आली आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्ट्रोल एज, मॅट्रीझ, रिपब्लिक, न्यूज 24 पी-मार्क, एसएएस ग्रुप हैदराबाद, दैनिक भास्कर, लोकशाही आणि झी AI या 10 संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये, 10 पैकी 7 संस्थांनी भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवले आहे. तर, 3 संस्थांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या 10 संस्थांचा सरकारी एक्झिट पोल पाहिल्यास महायुतीला 139 ते 156 जागांवर विजय मिळू शकतो. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतर व अपक्ष मिळून कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 29 जागा मिळतील असा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या: