Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Vidhan Sabha Election 2024 : कित्येक महत्त्वाच्या घटनांचं अचूक भाकित सांगणाऱ्या ज्योतिषांनी येत्या निवडणुकीचंही भविष्य सांगितलं आहे. राज्यात पुढची सत्ता कोणाची येणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण बनणार याचा अंदाज यातून मिळतो.
Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी (Vidhan Sabha Elections 2024 Result) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्या म्हणजे निवडणुकीच्या निकालाकडे. प्रत्येक जण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. अगदी काही क्षणांत या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? शिवसेना ठाकरे गट भाजपला वरचढ ठरणार का? आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार का? पाहूया शिवसेनेच्या दृष्टीने ज्योतिषांनी केलेलं भाकित
शिवसेना सत्तेत येणार?
19 जून 1966 रोजी सकाळी 9:30 वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतीही शुभ मुहूर्त न पाहता फक्त नारळ फोडून शिवसेना संघटनेची स्थापना केली. हळूहळू ही संघटना पक्षाच्या रुपात राजकारणातही सक्रिय झाली. तेव्हापासून आजतागायत शिवसेना म्हणून महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांची प्राणप्रतिष्ठा म्हणून ओळखली जाते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आपलं स्थान निर्माण करू शकते हे या कुंडलीतून पाहायला मिळणार आहे.
शिवसेनेची कुंडली काय सांगते?
स्थापना दिनांक - 19 जून 1966, वेळ सकाळी 9:30, ठिकाण मुंबई - महाराष्ट्र.
कर्क लग्न राशी आणि मिथुन राशीत कुंडली तयार होते, ज्यात पाचव्या घरात केतू , शनि नवव्या घरात, शुक्र दहाव्या घरात, राहू आणि मंगळ अकराव्या घरात आणि सूर्य, चंद्र, गुरू आणि बुध बाराव्या घरात आहेत.
राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास ही कुंडली अतिशय बलवान कुंडली आहे, कारण या कुंडलीत गुरु ग्रह बाराव्या घरात राहून विपरित राजयोग निर्माण करत आहे. आरोहीचा स्वामी चंद्र देखील बाराव्या घरात आहे, जे इतकं चांगलं म्हणता येणार नाही. परंतु गुरूसोबत असल्यामुळे चंद्राची शक्ती वाढते.
धनाचा स्वामी सूर्यही बाराव्या घरात आहे. कुंडलीत सूर्याची दृष्टी पडणं हे शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी शुभ चिन्ह मानलं जाईल आणि स्वतःच्या राशीवर बृहस्पतिचं दर्शन देखील शत्रूंवर विजय मिळण्याची शक्यता दर्शवते.
याशिवाय दशम घराचा स्वामी मंगळ अकराव्या घरात राहूसोबत आहे, या संयोगामुळे शत्रूंवर विजय मिळण्याची शक्यता असते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना बाजी मारणार?
ग्रहस्थितीनुसार, विधानसभेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या निकालात मतांच्या फरकाने विजयाचा निर्णय शिवसेनेच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे.
ग्रह काय सांगतात?
बुध महादशेमध्ये चंद्राची अंतरदशा सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. चंद्र बाराव्या भावात असून त्याची ताकद खूपच कमकुवत मानली जाईल. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर, ही स्थिती शत्रूपक्षावर विजय मिळवण्यासाठी पुरेशी आहे.
कोण होणार पुढचा मुख्यमंत्री?
वाचा :