एक्स्प्लोर
लग्नसराईत खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सात दिवस सोन्याचा दर चांगलाच घरसला आहे.
silver rate today (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात सोनं साधारण 3710 रुपयांनी स्वस्त झालं आहे. राजधानी दिल्लीचा विचार करायचा झाल्यास 17 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 75800 रुपये प्रति10 ग्रॅम होता. त्यामुळे आता कोणत्या शहरात सोन्याचा भाव किती आहे? तसेच सोन्याच्या भावात घट नेमकी का होत आहे? ते जाणून घेऊ या...
2/6

मनीकंट्रोल या वृत्तविषय संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर याच शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबई आणि कोलकाता या शहरांत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 75,650 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69,350 रुपये होता.
Published at : 18 Nov 2024 02:09 PM (IST)
आणखी पाहा























