एक्स्प्लोर
IPO: रियल्टी फर्म सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ येणार, सेबीने दिली मंजुरी; जाणून घ्या सविस्तर माहिती
Signature Global IPO: मागील काही महिन्यात शेअर बाजारात आलेल्या काही कंपन्यांच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. आता, रियल्टी क्षेत्रातील सिग्नेचर ग्लोबल लिमिटेड कंपनीचा IPO येणार आहे.
IPO: रियल्टी फर्म सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ येणार, सेबीने दिली मंजुरी; जाणून घ्या सविस्तर माहिती
1/10

मागील काही महिन्यात शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ आणला.
2/10

रियल्टी क्षेत्रातील सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे. सेबीने कंपनीला 1000 कोटींचा निधी उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.
3/10

सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडने जुलै महिन्यात सेबीकडे दस्ताऐवज जमा केले होते.
4/10

सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड ही मुख्यत: परवडणारी घरे आणि मिड-हाउसिंग सेगमेंटमध्ये कार्यरत आहे.
5/10

आयपीओद्वारे कंपनीकडून 750 कोटींचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत.
6/10

त्याशिवाय कंपनीकडून प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडून 250 कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे करणार आहेत.
7/10

आयपीओतून मिळणाऱ्या निधीतून कंपनी कर्जाची परतफेड, जमीन खरेदी आणि व्यावसायिक कारणांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.
8/10

त्याशिवाय या निधीतून सिग्नेचर फर्मची उपकंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे.
9/10

सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडची वर्ष 2021-22 मध्ये एकूण उत्पन्न 939.6 कोटी रुपये इतके होते. मागील आर्थिक वर्षात 154.7 कोटी रुपये इतके होते.
10/10

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मागील एक दशकापेक्षाही कमी कालावधीत 31 मार्च 2022 पर्यंत 23,453 निवासी आणि व्यावसायिक गाळे विक्री केली आहे. हे सर्व दिल्ली-एनसीआर भागात विक्री केली आहे.
Published at : 29 Nov 2022 11:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























