एक्स्प्लोर
Share Market: विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा ट्रेंड सलग तिसऱ्या महिन्यात कायम,भारतीय बाजारातून सप्टेंबरमध्ये 23885 कोटी रुपये काढून घेतले
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील विक्रीचं सत्र सलग तिसऱ्या महिन्यात कायम ठेवलं आहे. सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी समोर आली आहे.
शेअर मार्केट अपडेट
1/6

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्यात 23885 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत.
2/6

सलग तिसऱ्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. जुलै महिन्यात 17700 कोटी रुपये FPI नं काढून घेतले होते. तर, ऑगस्ट महिन्यात 34990 कोटी रुपये एफपीआयनं काढून घेतले होते.
3/6

अमेरिकेनं भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. एच वन बी व्हिसाचं शुल्क 88 हजारांवरुन 88 लाख रुपये करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतल्याचा यावर परिणाम विदेशी गुंतवणूकदारांच्या पैसे भारतीय बाजारातून काढण्याच्या निर्णयावर दिसून आला.
4/6

रुपयाची विक्रमी घसरण आणि भारतीय शेअरचं महागडं मूल्यांकन यामुळं गुंतवणूकदारांनी आशियातील इतर बाजारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येते. इक्विटी मार्केटमधून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढले असले तरी डेब्ट मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु आहे.
5/6

जियोजित इन्वेस्टमेंटसचे चीफ इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट वीक विजयकुमार यांनी विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून दुसऱ्या बाजारात गुंतवणूक केल्यानं नफ्यात आहेत. कारण गेल्या वर्षी भारतीय शेअर बाजार बहुतांश जागतिक बाजारांच्या तुलनेत मागं राहिला होता.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 05 Oct 2025 07:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
























