एक्स्प्लोर
LIC : एलआयसीनं कोणत्या पाच स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली? अपडेट समोर, देशातील सर्वात मोठ्या बँकेचा समावेश
LIC Investment : भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीकडून विविध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाते. आता एलआयसीनं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवली याबाबत माहिती समोर आली आहे.
एलआयसीनं 'या' कंपन्यांमधील गुंतवणूक वाढवली
1/5

विविध कंपन्यांकडून आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीचे निकाल जाहीर केले जात आहेत. त्यामुळं विविध कंपन्यांमध्ये कुणी भागीदारी वाढवली याची माहिती समोर येत आहे. एलआयसीनं ज्या पाच कंपन्यांमध्ये भागीदारी वाढवली ती माहिती समोर आली आहे. हीरो मोटोकॉर्प कंपनीत एलआयसीनं गुंतवणूक वाढवली आहे. हीरो मोटोकॉर्पमधील एलआयसीची भागीदारी आता 5.92 टक्क्यांवर पोहोचली आहे. हीरो मोटोकॉर्पचं मार्केट कॅप 77090 कोटी रुपये आहे.
2/5

एलआयसीनं भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील भागीदारी 6.52 टक्क्यांवरुन 0.22 टक्के वाढवून 6.74 टक्के केली आहे.
3/5

एलआयसीनं लार्सन अँड टुब्रो मधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं पाहायला मिळते. एलआयसीनं एल अँड टीमधील भागीदारी मार्च तिमाहीत 0.64 टक्क्यांनी वाढवली आहे. या कंपनीत एलआयसीची भागीदारी 13.25 टक्के झाली आहे.
4/5

एशियन पेंट्समध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7.15 टक्के भागीदारी एलआयसीकडे होती. एलआयसीनं चौथ्या तिमाहीत 1.14 टक्के भागीदारी वाढवली. आता एलआयसीकडे 8.29 टक्के भागीदारी झाली आहे.
5/5

एलआयसीकडे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेतील भागीदारी ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत 9.28 टक्के होती. मार्च तिमाहीत ही भागीदारी 0.25 टक्क्यांनी वाढवली. एलआयसीकडे स्टेट बँकेतील भागीदारी 9.13 टक्के आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 11 May 2025 05:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























