एक्स्प्लोर
महत्त्वाची बातमी! रेल्वे विभागाने तिकीट आरक्षणाच्या नियमात केला मोठा बदल, लाखो लोकांवर थेट परिणाम होणार
भारतीय रेल्वे विभागाने आपल्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. या बदलाचा परिणाम देशातील लाखो रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे.

railway reservation rules change (फोटो सौजन्य- META AI)
1/6

Train Ticket Rules : भारतीय रेल्वेने एका महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे.
2/6

रेल्वे विभागाने हा बदल तिकीट आरक्षणासंदर्भात केला आहे. याआधी तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी 120 दिवस अगोदरच तिकीट बुक करता यायचे. म्हणजेच तुम्हाला चार महिन्यानंतरच्या प्रवासासाठी अगदोरच रिझर्वेशन करता यायचे. आता मात्र या नियमात बदल करण्यात आला आहे.
3/6

प्रवाशांना आता 120 ऐवजी फक्त 60 दिवसांआधी त्यांच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित करता येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू झाला आहे.
4/6

रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असला तरी काही विशेष रेल्वेगाड्यांवर या नियमांचा परिणा होणार नाही. ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस या रेल्वेंसाठी आरक्षणाचा हा नियम लागू होणार नाही. यासह परदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांआधीच्या आरक्षणाचा नियम कायम असेल.
5/6

रेल्वे विभागाच्या मतानुसार फक्त 13 टक्के प्रवासीच 120 दिवसांआधी त्यांच्या प्रवासासाठी अॅडव्हान्स तिकीट बुक करायचे. जास्तीत जास्त लोक हे 45 दिवसांआधी आपल्या प्रवासाचे तिकीट बुक करतात.
6/6

रेल्वे विभागाच्या या नव्या नियमामुळे तिकीट विक्रीतील काळाबाजार रोखला जाईल, असे रेल्वे विभागाने म्हटले आहे. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. भारतात रेल्वेतून दररोज साधारण 2.4 कोटी प्रवासी प्रवास करतात.
Published at : 01 Nov 2024 01:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion