एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
PPF Interest Rates: पीपीएफवर व्याज वाढणार? जाणून द्या केंद्र सरकार का घेणार हा निर्णय
PPF Interest Rates: पीपीएफवर व्याज वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते.
PPF Interest Rates: पीपीएफवर व्याज वाढणार? जाणून द्या केंद्र सरकार का घेणार हा निर्णय
1/10

पीपीएफ गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
2/10

केंद्र सरकार लवकरच पीपीएफचे व्याजदर वाढवू शकते. सध्या, PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
3/10

सरकारी रोख्यांवर सध्याचा व्याजदर 7.3 टक्के आहे. हा व्याज दर पीपीएफपेक्षा जास्त आहे.
4/10

जानेवारी 2022 मध्ये सिक्युरिटीजवरील व्याजदर 6.5 टक्के आणि जूनमध्ये 7.6 टक्के होता.
5/10

सप्टेंबरपर्यंत सलग नऊ तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
6/10

या महिन्यात होणाऱ्या बैठकीत त्यांचे व्याजदर वाढणे जवळपास निश्चित असल्याचे समजले जाते.
7/10

सरकारी रोख्यांचे व्याजदर आणि पीपीएफ यांचा थेट संबंध आहे. PPF वर सिक्युरिटीजच्या सरासरी व्याजदरापेक्षा 1 टक्के जास्त व्याज देण्याची तरतूद आहे.
8/10

सरकारी रोख्यांचे बाजारातील उत्पन्न जेवढे जास्त असेल, पीपीएफसारख्या लहान बचत योजनांचे व्याजदरही त्याच प्रमाणात वाढतील.
9/10

PPF सोबतच, गुंतवणूकदारांना इतर लहान बचत योजनांचेही व्याजदर वाढवले जाऊ शकतात.
10/10

यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र (KVP), फिक्स्ड डिपॉझिट, PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेमधीलही व्याजदर वाढवले जाऊ शकतात.
Published at : 16 Sep 2022 11:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























