एक्स्प्लोर
जिंकू द्या ओ बाबा... आकाश अंबानी महिनाभरात 5 व्यांदा साईचरणी; मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा प्रार्थना
यंदाच्या आयपीएल हंगामातील प्ले ऑफ सामने ठरले असून आता 3 जून रोजी 18 व्या हंगामातील आयपीएल विनर ठरणार आहे. त्यासाठी प्ले ऑफमधील सर्वच संघांची जोरदार तयारी सुरू आहे.
Akash ambani shirdi for IPL MI
1/8

यंदाच्या आयपीएल हंगामातील प्ले ऑफ सामने ठरले असून आता 3 जून रोजी 18 व्या हंगामातील आयपीएल विनर ठरणार आहे. त्यासाठी प्ले ऑफमधील सर्वच संघांची जोरदार तयारी सुरू आहे.
2/8

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्ले ऑफमध्ये एंट्री मिळवली असून या 4 पैकी 2 संघ अंतिम सामन्यात धडक देणार आहेत.
3/8

आयपीएलचे सामने सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभवाला सामोरे जात होती. मात्र, मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन आणि उद्योगपती नीता अंबानी यांनी साई दर्शनाला हजेरी लावली.
4/8

मुंबई इंडियन्सचा सामना पूर्ण होईपर्यंत साई मंदिर परिसरातच थांबून साईंचे दर्शन घेतलं. तिथून मुंबई इंडियन्सचा सुरू झालेल्या विजयाचा प्रवास अद्यापही सुरूच आहे.
5/8

आयपीएलचा यंदाचा 18 वा हंगाम असून आता अंतिम सामन्यांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे, मुंबई इंडियन्सचा हा प्रवास विजयाकडे जावा यासाठी उद्योगपती आकाश अंबानी यांनी गेल्या महिनाभरात आज पाचव्यांदा शिर्डीत साई दरबारी हजेरी लावली.
6/8

आयपीएल सामने सुरू झाल्यानंतर आकाश अंबानी यांनी 22 एप्रिल, 26 एप्रिल, 6 मे , 20 मे आणि आज 26 मे रोजी साई दर्शनासाठी हजेरी लावल्याचं दिसून आलं.
7/8

आकाश अंबानी यांनी पाचही वेळेला मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या निळ्या रंगाच्या शॉल साई समाधीवर अर्पण केल्या आहेत. आजही मुंबई इंडियन्सचा सामना पंजाबविरुद्ध होत आहे.
8/8

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत अंबानी कुटुंबीय आपला श्रद्धाभाव जपतात. त्यामुळेच, नीता अंबानी यांनी देखील आयपीएलदरम्यान शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले होते.
Published at : 26 May 2025 05:22 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















