हस्तांदोलन टाळल्यानंतर टीम इंडियाचा फायनलआधी आणखी एक निर्णय; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी काय घडलं?
Ind vs Pak Final Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान संघात आज खेळल्या जाणाऱ्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Ind vs Pak Final Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Final Asia Cup 2025) संघात आशिया चषकाचा (Asia Cup Final 2025) अंतिम आणि हायव्होल्टेज सामना आज (28 सप्टेंबर) रंगणार आहे. मात्र बहुप्रतिक्षित अशा या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संघात (Ind vs Pak Final) पारंपारिक प्री-फायनल ट्रॉफी शूट होणार नाही, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज (रविवारी) होणाऱ्या जेतेपदाच्या निर्णायक सामन्यात हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत, स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही देश आशिया कपच्या अंतिम सामन्यात भिडतील. मात्र असे असताना या सामान्यापूर्वी घडलेल्या काही घटना विशेष चर्चेत आल्या आहेत. त्यातच आता दोन्ही संघात पारंपारिक प्री-फायनल ट्रॉफी शूट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
अंतिम सामन्यापूर्वी फोटोशूटसाठी नकार (No captain’s photoshoot in India-Pakistan Asia Cup Final)
फायनलपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी ट्रॉफीसोबत फोटो सेशन करणे पारंपारिक आहे, परंतु सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासोबत फोटो काढण्यास स्पष्ट नकार दिला. या निर्णयाकडे राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे. अशातच, आयोजकांनी स्पष्ट केले की, कोणतेही अधिकृत फोटोशूट नियोजित नाही, संयुक्त कर्णधाराच्या ट्रॉफी पोझचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र हि शक्यता आता जवळ जवळ मावळली आहे.
आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव (IND vs PAK 2025 highlights)
आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सात विकेट्सने जिंकला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री 8 वाजता जेतेपदाची लढाई सुरू होत असताना, चाहत्यांचे लक्ष केवळ मैदानावरील लढाईवरच नाही तर सामन्यानंतरच्या सादरीकरणावर आणि संभाव्य नवीन वादांवर देखील असेल.
इतर महत्वाच्या बातम्या























