एक्स्प्लोर
Bigg Boss मधील 'या' जोड्या अडकल्या विवाहबंधनात, तर काहींचं झालं ब्रेकअप

1/6

करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल : टीव्ही सेलिब्रिटी करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्ये दिसून आले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असून हे नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचलं होतं. दरम्यान, लग्नापूर्वीच दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
2/6

अरमान कोहली आणि तनीषा मुखर्जी : सेलिब्रिटी अरमान कोहली आणि तनिषाही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. दोघांमध्येही शोमध्ये उत्तम केमिस्ट्री दिसून आली. मीडिया रिपोर्टनुसार, दोघंही लग्न करणार होते. परंतु, कुटुंबाच्या दबावामुळे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
3/6

प्रिंस नरूला आणि युविका चौधरी : बिग बॉसच्या सीझन 9 मध्ये दिसून आलेले प्रिन्स आणि युविका यांची कहाणी अगदीच फिल्मी आहे. शो दरम्यान प्रिन्सने युविकाला फिल्मी पद्धतीने हार्ट शेपची चपाती करुन प्रपोज केलं होतं. दरम्यान, शो संपल्यानंतर दोघांनीही लग्न केलं.
4/6

अली गोनी आणि जॅस्मिन भसीन : बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये अली गोनी आणि जॅस्मिन भसीनची जोडी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. दोघांमध्येही चांगलं बॉन्डिंग दिसून येत आहे. तसेच दोघांच्याही मनात एकमेकांच्या प्रती सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता येणाऱ्या काळात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की, दोघांचा हा एकमेकांप्रती असलेला सॉफ्ट कॉर्नर कितपत टिकेल.
5/6

कुशल टंडन आणि गौहर खान : अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, याआधी गौहरचं अफेअर कुशाल टंडनसोबत होतं. दोघेही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. तिथेच त्यांच्यात प्रेम जुळलं. दरम्यान, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.
6/6

असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण सध्या रियॅलिटी शोमध्ये जोड्या जुळत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं आम्ही म्हणत नाही, तर तसं पाहायला मिळत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शो बिग बॉसमध्ये अनेक जोड्या बनताना दिसत आहेत. त्यापैकी काहींनी आपली लग्नगाठ बांधली, तर काहींच्या प्रेमाच्या चर्चा बराच काळ रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
