एक्स्प्लोर
Surya Gochar 2025 : तब्बल 12 वर्षांनंतर मिथुन राशीत होणार ग्रहांचा 'महासंगम'; 'या' 5 राशींचं संकट टळणार, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद
Surya Gochar 2025 : 15 जून 2025 रोजी सूर्य मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या ठिकाणी एकाच राशीत गुरु, सूर्य आणि बुध ग्रह एकत्र दिसणार आहेत. याचा काही राशींना लाभ मिळेल.
Surya Gochar 2025
1/8

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचं संक्रमण आणि त्यांची स्थिती ठराविक अंतराने बदलते. यंदा तब्बल 12 वर्षांनंतर मिथुन राशीत ग्रहांची दुर्लभ स्थिती जुळून येणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे.
2/8

15 जून 2025 रोजी सूर्य मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. या ठिकाणी मिथुन राशीत बृहस्पती ग्रह आणि बुध ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे या ठिकाणी एकाच राशीत गुरु, सूर्य आणि बुध ग्रह एकत्र दिसणार आहेत. याचा काही राशींना लाभ मिळेल.
3/8

अशा प्रकारे 12 वर्षांनंतर मिथुन राशीत 2025 च्या शुभ ग्रहांची सर्वात मोठी ब्रम्हांड तिकडी बनणार आहे. यामध्ये बुधादित्य योग, गुरु आदित्य योग आणि त्रिग्रही योगासह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत.
4/8

ग्रहांची ही शुभ स्थिती 15 जून 2025 नंतर मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागतील. नोकरदार वर्गातील लोकांचं सुद्धा कामाच्या ठिकाणी कौतुक केलं जाईल.
5/8

कन्या राशीच्या लोकांना गुरु आदित्य योगाचा चांगला लाभ मिळेल. या दरम्यान तुमचं घर, गाडी, वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तसेच, नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे.
6/8

त्रिग्रही योग मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाचा लाभ घेता येईल. तसेच, तुमचे आरोग्यही चांगले राहील. तुमची लव्ह लाईफ सुरळीत राहील.
7/8

सिंह राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. जर तुम्हाला नवीन बिझनेसची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Jun 2025 01:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















