एक्स्प्लोर
Sindhudurg : दक्षिण कोकणातील जागृत आणि प्रसिद्ध जैतिर उत्सवाला सुरुवात; नवसाला पावणाऱ्या देवाला शेकडो भाविकांची गर्दी, पाहा फोटो
Sindhudurg : वेंगुर्ल्याच्या तुळस गावात जैतिर उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या प्रसिद्ध उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्रासह अन्य ठिकाणांहून भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात जणू भक्तीचा मळा फुलला आहे.
Sindhudurg Jaitir festival begins
1/10

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील जैतिर मंदिरात जैतिर उत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/10

नवसाला पावणारा नराचा नारायण म्हणून जैतिर देव प्रसिद्ध आहे.
3/10

तुळस गावचं प्रमुख देवस्थान असलेल्या जैतिर मंदिरात पुढील 11 दिवस जैतिर उत्सव सुरू असणार आहे.
4/10

पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांची गर्दी हा उत्सव पाहायला झाली होती.
5/10

साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळापासून हा जैतिर उत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
6/10

माहेरवाशींना पावणारा नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध आहे.
7/10

महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटकमधून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येथे येत असतात.
8/10

पावसाच्या तोंडावर हा जैतिर उत्सव असल्याने या उत्सवात शेतीची अवजारं विकण्यासाठी आणली जातात.
9/10

जैतिर उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
10/10

कवळासाने या उत्सवाची सांगता होते.
Published at : 07 Jun 2024 12:25 PM (IST)
आणखी पाहा























