एक्स्प्लोर
Guru Purnima 2025 : सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी होतेय गुरुपौर्णिमा; दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी, पाहा PHOTO
Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविक सोलापुरातील अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले आहेत.
Guru Purnima 2025
1/9

आज गुरु पौर्णिमेचा दिवस राज्यासह देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय.
2/9

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविक सोलापुरातील अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले आहेत.
3/9

स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट येथे दाखल झाले आहे.
4/9

या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी जमली आहे.
5/9

भक्तांना आज स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेता येणार आहे.
6/9

तसेच, भाविकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेता यावं यासाठी आज रात्री बारापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल असे मंदिराच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.
7/9

या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य अशी रांगोळी देखील काढण्यात आली आहे.
8/9

तसेच, अन्नछत्र मंडळातर्फे लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोयदेखील या ठिकाणी करण्यात आली आहे.
9/9

गुरुपौर्णिमेनिमित्त आज महाराष्ट्रातील विविध मंदिरांत भक्तांचा जनसागर अशाच पद्धतीने पाहायला मिळतोय.
Published at : 10 Jul 2025 09:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















