एक्स्प्लोर
Astrology : शिवलिंगासमोर बेलपत्रावर दिवा का लावतात? जाणून घ्या वास्तूशास्त्र...
Astrology : हिंदू धर्मशास्त्रानुसार, बेलपत्रावर दिवा लावून शिवलिंगासमोर ठेवल्यास आध्यात्मिक ऊर्जा वाढते. तसेच, नकारात्मकता दूर होते.
Astrology
1/8

शिव पुराणानुसार, भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. जेव्हा शिवलिंगावर दिवा लावला जातो यामुळे पूजा पूर्ण होते असं म्हणतात. यामुळे आपली भक्ती देवापर्यंत पोहोचते.
2/8

दिव्याच्या प्रकाशाने अज्ञानरुपी अंधकार दूर होतो. जेव्हा बेलपत्रावर ठेवून शिवलिंगासमोर दिवा लावला जातो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जेला तो आकर्षित करतो.
3/8

दिवा लावणे हा अग्नि तत्वाचं प्रतिनिधीत्व करतो. यामुळे भक्ताला आध्यात्मिक ऊर्जा मिळते.
4/8

शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, बेलपत्रावर दिवा लावल्याने पितृ दोष तसेच, कालसर्प दोष कमी होतो. आणि पवित्रता वाढते.
5/8

बेलपत्र आणि दिवा यांचं भगवान शंकराच्या पूजेत फार महत्त्वाचं स्थान आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि घरात सुरक्षा कवच निर्माण होते.
6/8

वास्तू शास्त्रानुसार, शिवलिंगासमोर दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे दारिद्र्य, रोग आणि वाद यांसारखे दोष दूर होतात.
7/8

पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने देखील भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्रावर दिवा लावला होता.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 May 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा























