एक्स्प्लोर
वर्ष सरलं पण शेतीत काय घडलं?
2022 हे वर्ष शेतीसाठी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेमकं कसं गेलं? शेती क्षेत्रात (Agricultural Sector) या सालात नेमक्या काय घडामोडी घडल्या याचा सविस्तर आढावा

agriculture Higlights in 2022
1/9

15 ऑक्टोबर 2022 पासून राज्यात ऊसाचा गाळप हंगाम सुरु करण्यात आला. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर आहे. राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 साखर कारखाने सुरू झाले आहेत.
2/9

ऊस दरासाठी आणि एकरकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात त्यांच्या आंदोलनाला यश आले. जवळफास सर्वच कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याचं मान्य केलं. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत 9 दिवस जागर यात्रा काढली.
3/9

यावर्षी राज्यात पावसानं कहरच केला होता. सुरुवातील जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, नंतरच्या काळात म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी राज्यात धुमाकूळ घातला होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
4/9

सोयाबीन- कापूस (Soybean-Cotton) उत्पादकांच्या मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 50 हजार शेतकऱ्यांसह त्यांनी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत दाखल झाले होते.
5/9

जून महिन्यात लाबंलेल्या पावसानं जुलैमध्ये हजेरी लावली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं सोयाबीनची पेरणी केली होती मात्र,. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं होतं. गोगलगाय कोवळ्या सोयाबीनचा फडशा पाडत असल्यानं शेतकऱ्यांपुढं मोठ संकट निर्माण झालं होतं. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत जाहीर केली होती.
6/9

राज्यात शिंदे-फडणवीस हे नवीन सरकार अस्तित्त्वात आलं. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर नव्या मंत्रीमंडळात कृषीमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली.
7/9

महाराष्ट्रात नऊ महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये 2 हजार 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या विदर्भात झाल्या आहेत.
8/9

यावर्षी देशातील काही राज्यात लम्पी स्कीन आजारानं थैमान घातलं आहे. यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. या आजारामुळं अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रताही जवळसाप 30 जिल्ह्यांमधील जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळाले.
9/9

1 जून 2022 रोजी पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरु केले होते. 2017 च्या ऐतिहासिक संपानंतर पाच वर्षांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 जून पासून धरणे आंदोलन सुरू झाले होते.
Published at : 27 Dec 2022 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
