एक्स्प्लोर
Lemon : राज्यात उन्हाचा चटका वाढला, लिंबाच्या दरात वाढ
तापमानाचा पारा वाढल्यानं बाजारपेठेत लिंबाच्या (Lemon) मागणीत वाढ झाली आहे. लिंबाची मागणी वाढल्यानं लिंबाचे दरही दुपटीनं वाढले आहेत.
lemon
1/9

सध्या राज्यात तापमानात (Tempreture) चढ उतार होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे
2/9

तापमानाचा पारा वाढल्यानं बाजारपेठेत लिंबाच्या (Lemon) मागणीत वाढ झाली आहे. लिंबाची मागणी वाढल्यानं लिंबाचे दरही दुपटीनं वाढल्याचं चित्र दिसत आहे.
3/9

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांकडून 80 ते 100 रुपये प्रति किलो दरानं लिंबाची विक्री केली जात आहे.
4/9

राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. तापमान वाढल्यानं लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
5/9

लिंबाचे दर (Lemon Price) वाढल्यानं शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे. 80 ते 100 रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होत आहे.
6/9

बाजार समितीत लिंबाला 60 ते 70 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. लिंबाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी आहेत
7/9

उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी लिंबू सरबत किंवा इतर शीतपेयांमध्ये लिंबाचा वापर केला जातो. त्यामुळं उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते.
8/9

महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लिंबाचं उत्पादन घेतलं जाते. मात्र, काही वेळाला हवामानातील बदलाचा मोठा फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसतो
9/9

महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या मार्केटमध्ये लिंबू पाठवली जातात. आंध्र प्रदेश सर्वात जास्त लिंबाचे उत्पादन करणारे राज्य आहे.
Published at : 12 Mar 2023 11:08 AM (IST)
आणखी पाहा























