एक्स्प्लोर

'फक्त' दोन हजारांची लाच घेताना तीन RTO अधिकारी जाळ्यात, यवतमाळच्या ड्रायव्हिंग स्कूलने केला 'कार्यक्रम'

Yavatmal RTO Officers Arrested : जिल्ह्यातील 10 ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रत्येकी 200 अशी 2000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने तीनही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. 

यवतमाळ : आरटीओ खात्यातील अधिकारी लाखोंची लाच घेताना अटक अशा अनेक बातम्या आतापर्यंत ऐकण्यात येत आल्या असतील. पण यवतमाळमध्ये लाचेचा एक वेगळाच किस्सा घडला. फक्त दोन हजारांची लाच घेताना आरटीओ खात्याचे तीन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. शिकाऊ आणि कायम स्वरुपाचे लायसन्स देण्याच्या बदल्यात एजंटच्या माध्यमातून दोन हजारांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली. सुरज गोपाल बाहीते,  मयुर सुधाकर मेहकरे, बिभिषण शिवाजी जाधव असे लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नावे आहेत.

Yavatmal RTO Officer Arrested : नेमकं काय घडलं? 

शिकाऊ आणि कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलनाच्या व्यतिरिक्त 200 रुपये प्रमाणे 10 क्लासेसकडून एकूण दोन हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी आरटीओतील तीन अधिकाऱ्यांसह खासगी एजंटला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पुसद येथे आरटीओ कॅम्प परिसरात करण्यात आली. यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे अधिकारी कार्यरत आहेत. बलदेव नारायण राठोड, रा. वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी एजंटचे नाव आहे. 

ड्रायव्हिंग स्कूल संचालिकेची तक्रार

लायसन्स कँपदरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी तक्रार सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या एका महिला संचालिकेने 7 मे 2025 रोजी तक्रार केली होती. ही लेखी तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने कारवाई करत या तीनही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं. याप्रकरणी वसंतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर

व्हिडीओ

Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Embed widget