एक्स्प्लोर

Yavatmal Crime: जागेचा वाद टोकाला; पुतण्याने केली चुलत भावाची हत्या तर काका गंभीर जखमी

Yavatmal News:  यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोरील जागेच्या वादातून पुतण्याने  काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला.

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News)  जागेचा वाद इतका विकोपाला गेला की, पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक (Crime in Yavatmal) हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर एक जण गंभीर झाला.  या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

 यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोरील जागेच्या वादातून पुतण्याने  काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक  सायंकाळच्या सुमारास घडली. राहुल पाली (27 ), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र पाली (50) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर सूरज पाली, असे संशयीत मारेकऱ्याचे नाव आहे. नविन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या खुनाच्या घटनेची नोंद झाली.

शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर पाली कुटूंबीय वास्तव्यास आहे.  दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते.  संशयीत सूरज पाली याचा काका नरेंद्र, चुलत भाऊ राहुल याच्यासोबत चांगलाच वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात सूरज याने चक्क लोखंडी रॉडने काका नरेंद्र आणि चुलत भाऊ राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही खाली पडले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

उपचारा दरम्यान राहुल पाली याचा मृत्यू झाल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली. तर गंभीर जखमी असलेल्या नरेंद्र पाली यांच्यावर उपचार सुरू आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे. या खून प्रकरणात संशयीत सूरज पाली याच्यासह दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे. राहुल पाली हत्या प्रकरणातील संशयीत मारेकऱ्यांची नावे पोलिसांसमोर असून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम मारेकऱ्यांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे.  या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget