एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

CBI Raid Nagpur : वेकोलीच्या अधिकाऱ्याच्या घर-कार्यालयावर सीबीआयच्या धाडी; आतापर्यंत 67 लाखांची अतिरिक्त मालमत्ता उघड!

सीबीआयला नवलेच्या 6 बँक खात्यांमध्ये 6.16 लाख आणि 13.29 लाख रुपयांचे दागिने सापडले. नवले यांच्या मालकीच्या विविध ठिकाणी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापेमारी करून या प्रकरणाशी संबंधित 7 कागदपत्रे जप्त केली.

CBI Raid at WCL officer in Nagpur : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या WCL (वेकोली) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी (3 जानेवारी) सीबीआयने छापा घातला. या छाप्यात सीबीआयने (CBI) अनेक महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले. मनोज पुनिराम नवले असे अधिकाऱ्याचे नाव आहे. अचानक पडलेल्या सीबीआयच्या छाप्यामुळे वेकोलीच्या काही लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज नवले हे बल्लारपूर-चंद्रपूर येथील वेकोलीमध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नवले यांच्याकडे कोळसा खदान प्रकल्पाच्या शेतजमिनीबाबतची अनेक प्रकरणे आहेत. पैसे घेतल्याशिवाय कोणतीच कामे नवले करत नसल्याची अनेकांची ओरड होती. नवले यांनी मंजुरी दिलेल्या काही शेतजमिनीच्या अधिग्रहण प्रकरणात कोट्यवधीची कमाई केल्याची माहिती होती. त्यामुळे नवले यांनी बेकायदेशीरमार्गाने कमावलेली संपत्ती जास्त असल्याची तक्रार सीबीआयकडे प्राप्त झाली होती. 

सीबीआयचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. खान यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. नवले यांना नोटीस देऊन घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. नवले यांना कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नवले यांच्या खुल्या चौकशीत सीबीआयला लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे. नवले यांच्याकडे एकूण कमाईच्या 67 लाख 7 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे सीबीआयने नेवले यांना ताब्यात घेतले आहे. तसेच नवले यांची पुढील चौकशी सुरु आहे. तसेच प्राप्त दस्तावेजाच्या आधारे ही रक्कम वाढण्याचीही शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

1999 मध्ये झाली होती WCL मध्ये बदली

जून 1999 ते 2017 या कालावधीत नवले यांचे उत्पन्न आणि मालमत्तेची गणना करण्यात आली. 2017 मध्ये 28.84 कोटी रुपयांच्या डिझेल, स्फोटके आणि पेट्रोलियम ऑईल स्नेहकांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवले यांच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. नवले नोव्हेंबर 1990 मध्ये SECL मध्ये कनिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत रुजू झाले. जून 1999 मध्ये त्यांची डब्ल्यूसीएलमध्ये (WCL) बदली झाली आणि 2017 पर्यंत ते डब्ल्यूसीएलच्या बल्लारपूर भागात तैनात होते. ऑगस्ट 2009 ते मे 2014 या कालावधीत त्यांची सस्ती OCM येथे खाण व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. नवले यांनी बेकायदेशीररित्या स्वत:च्या नावावर आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे जंगम मालमत्ता जमवल्याची माहिती आहे.

स्वतः अन् पत्नीच्या नावे जमीन

नवले यांच्याकडे नागपूरच्या धामना येथे दोन निवासी जमीन, गडचिरोली जिल्ह्यातील रामपूर गावात एक जमीन, पत्नी ज्योतीच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यात एक जमीन, देवनगरमध्ये एक फ्लॅट आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोसरा गावात चार जमिनी आहेत. सीबीआयला नवलेच्या 6 बँक खात्यांमध्ये 6.16 लाख आणि 13.29 लाख रुपयांचे दागिने सापडले. नवले यांच्या मालकीच्या विविध ठिकाणी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापेमारी करून या प्रकरणाशी संबंधित 7 कागदपत्रे जप्त केली. डीआयजी सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

ही बातमी देखील वाचा...

भारत लवकरच 'कॉन्टेम मिशन' सुरू करणार ; पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. सूद यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget