WTO : विकसित देशांची भारतासमोर नरमाईची भूमिका, ट्रिप्स करारांतर्गत विकसनशील देशांच्या मसुद्यावर विचार करण्याची तयारी
WTO 12th Conference : जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय परिषदेतील अंतिम मसुद्यांवर लागणारी भारताची मोहर हा भारताचाच विजय असल्याचं स्पष्ट होतंय.
WTO 12th Conference : जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत विकसित देशांनी काहीशी नरमाईची भूमिका घेऊन भारताने मांडलेल्या मुद्द्यांचा मसुद्यात समावेश करण्याची तयारी दर्शवली. जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेत वाटाघाटींच्या केंद्रस्थानी भारत होता. भारताकडून विकसनशील देशांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आली. ज्यामुळे विकसित देशांना अंतिम मसुद्यात भारताच्या भूमिकेचा देखील विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
पियूष गोयल म्हणाले, भारत एकप्रकारे आपल्या एमएसएमई, शेतकरी आणि मच्छिमारांसाठी ठामपणे जागतिक स्तरावर उभा राहिला. त्यामुळे गरीब आणि असुरक्षित घटकांचा आवाज जागतिक स्तरावर बळकट झालाय. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय परिषदेतील अंतिम मसुद्यांवर लागणारी भारताची मोहर हा भारताचाच विजय असल्याचं स्पष्ट होतंय. भारताला खात्री आहे की, डब्ल्यूटीओच्या दीर्घकाळ पाहिलेल्या सर्वात यशस्वी मंत्रिस्तरीय परिषदेपैकी एक अशी ही परिषद ठरेल.
मंत्रिस्तरीय बैठकीत विकसनशील देश आणि विकसित देशांत झालेल्या चर्चांनंतर मत्स्यव्यवसाय, आरोग्य, डब्ल्यूटीओ रिफॉर्म्स, डिजिटल तंत्रज्ञान, अन्नधान्य सुरक्षा आणि पर्यावरणावरील विषयांवरच्या मसुद्यावर भारताची बाजू ऐकून त्यावर विचार करण्यास भाग पाडलंय. भारताच्या काही मुद्द्यांना करारात समाविष्ट करण्यात आलंय. हा भारतासाठी आणि सोबतच विकसनशील देशांसाठी मोठा विजय आहे.
भारतानं अन्नधान्य सुरक्षा, मासेमारीसंदर्भात उघडपणे विकसित देशांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. ट्रिप्स पेटंटच्या अटींमध्ये शिथिलता मिळू नये याकरता विकसित देशांनी खोडा देखील घातला होता. दुसरीकडे, मस्त्य व्यवसाय करारासाठी तयार केलेल्या मसुदा भारताला मान्य नसल्याचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी परिषदेत स्पष्ट केल्यानंतर यावर पुन्हा एक दिवसाचा अवधी परिषदेचा वाढवण्यात आला होता आणि काही मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :