World's Top 7 Cities For Expats: राहण्यासाठी अन् काम करण्यासाठी खास आहेत ही टॉप 7 शहरं
जर तुम्हाला परदेशात जाऊन तिथे काही दिवस राहायचं असेल आणि काम करायचे असेल तर जाणून घ्या ही टॉप 7 शहरं
World's Top 7 Cities For Expats Living & Working 2021: जर तुम्हाला परदेशात जाऊन तिथे काही दिवस राहायचं असेल आणि काम करायचे असेल तर जाणून घ्या जगातील राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी योग्य असणारी ही 7 शहरे.
नुकताच एक सर्वे करण्यात आला. सर्वेमध्ये प्रवासी समुदाय इंटरनॅशनलच्या 12,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. या सर्वेनुसार,परदेशात राहण्यासाठी आणि तिथे काम करण्यासाठी योग्य असणाऱ्या टॉप 7 शहरांची यादी तयार करण्यात आली. पाहूयात ही यादी-
1- क्वालालंपूर
टॉप-7 शहरांमध्ये क्वालालंपूर हे शहर पहिल्या स्थानावर आहे. सर्वेनुसार, क्वालालंपूरमधील परदेशी रहिवासी हे राहण्यासाठी होणार खर्च आणि त्यांचे वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेवर समाधानी आहेत.
2. स्पेनमधील मलागा शहर-
सर्वेनुसार, 86 टक्के स्पेनमधील मलागा शहरात राहणारे परदेशी रहिवासी हे येथे राहण्यासाठी होणाऱ्या खर्चावर समाधानी आहेत. तसेच 81 टक्के लोक इथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल देखील समाधानी आहेत.
3. दुबई-
सर्वेनुसार, दुबईतील 72 टक्के परदेशी रहिवासी हे जीवनशैलीवर खूश आहेत तर 81 टक्के वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेवर समाधानी आहेत.
4 सिडनी-
सिडनीमध्ये राहणाऱ्या 82 टक्के परदेशी प्रवाशांना सुविधा पसंतीस पडल्या आहेत. तसेच 89 टक्के लोक तेथील मिळणाऱ्या वैद्यकिय सुविधांबद्दल समाधानी आहेत.
5- सिंगापूर
सिंगापूर शहरात राहणाऱ्या प्रवाशांपैकी 79 टक्के प्रवाशांना तेथील सुविधा पसंतीस पडल्या आहेत. तसेच 78 टक्के लोकांना सिंगापूरमधील जीवनशैली आवडली असून 89 टक्के लोकांना येथील वैद्यकिय सुविधा या पसंतीस पडल्या आहेत.
6 व्हिएतनाम-
व्हिएतनामधील मिन्ह शहरामधील 89 टक्के प्रवाशांना येथील जीवनशैली पसंतीस पडली आहे.
7- चेक रिपब्लिकमधील प्राग
प्राग शहरामधील 74 प्रवासी हे त्यांच्या नोकरीमुळे समाधानी आहेत. तसेच स्थलांतरित झालेले 79 टक्के लोक येथील काम आणि जीवनातील संतुलनावर खूश आहेत.