एक्स्प्लोर

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे का होतात रक्ताच्या गुठळ्या? शास्त्रज्ञांनी सांगितले कारण!

Coronavirus vaccine and blood clouts : अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात, याबाबत शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू होते.

Blood Clouts Due to Corona Vaccine : कोरोना महासाथीच्या आजाराला अटकाव करण्यासाठी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाची लस प्रभावी ठरली. मात्र, लशीचा वापर केल्यानंतर त्याचे काही दुष्परिणामही समोर येऊ लागले होते. यामध्ये लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याची तक्रारही समोर आली होती. या तक्रारीनंतर काही देशांनी लशीचा वापर थांबवला होता. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात? याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. 

ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील आणि अमेरिकेतील संशोधकांच्या पथकाने याबाबत संशोधन केले आहे. रक्तातील प्रथिने लशीच्या मुख्य घटकांकडे कशी ओढले जातात याबाबत त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर एक साखळी प्रक्रिया सुरू होते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचाही समावेश असतो. या प्रक्रियेतून रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे. 'बीबीसी'ने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे जगामध्ये लक्षावधी लोकांचे कोरोनापासून संरक्षण झाले आहे. भारतात ही लस सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली असून 'कोविशिल्ड' या नावाने दिली जाते. लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आल्यानंतर भारतातही चिंता व्यक्त केली जात होती. एकूण जगभरात अॅस्ट्राझेनकाची लस घेतलेल्यांच्या संख्येच्या तुलनते रक्ताची गुठळ्या तयार झाल्याच्या प्रकरणांची संख्या अतिशय नगण्य आहे. 

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या का तयार होतात, याचे कारण जाणून घेण्यासाठी 40 वर्षाखालील व्यक्तींना लस कशा प्रकारे दिली जाते ही बाबदेखील लक्षात घेण्यात आली. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात, हे दुष्परिणाम थांबवता येऊ शकतात का, याबाबत संशोधन करण्यात आले. ब्रिटन सरकारने कार्डिफमधील संशोधकांना आपात्कालीन निधीदेखील पुरवला. या संशोधकांनी काही प्राथमिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर अॅस्ट्राझेनकाचे शास्त्रज्ञ देखील या संशोधनात सहभागी झाले होते. लसीपेक्षा कोविड संसर्गामुळे गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते आणि ते का होतात याचे संपूर्ण स्पष्टीकरण अद्याप समोर आले नसल्याचे अॅस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी म्हटले. 

 निष्कर्ष काय ?

ही लस स्नायूमध्ये टोचली जाते. मात्र, काही वेळेस रक्तप्रवाहात लस जाते. तेथे लस ही रक्तातील पेशी (प्लेटलेट) फॅक्टर 4 मध्ये प्रथिनांना आकर्षित करू शकते. 

रोगप्रतिकारक प्रणाली ही प्लेटलेट फॅक्टर 4 आणि विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या अॅन्टीबॉडीमध्ये गोंधळात पडते. त्यातून अॅन्टीबॉडी आणि प्लेटलेट फॅक्टर 4 हे एकत्र होतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. 

हे संशोधन विज्ञान विषयक नियतकालिक  Science Advances मध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार लशीतील एडिनोव्हायरस ही प्लेटलेट 4 प्रथिनांना एखाद्या चुंबकासारखे आकर्षित करते. कार्डिफ विद्यापीठातील संशोधक प्रा. अॅलन पार्कर यांनी 'बीबीसी'ला सांगितले की,  एडिनोव्हायरसचा पृष्ठभाग अत्यंत नकारात्मक आहे आणि प्लेटलेट फॅक्टर चार अत्यंत सकारात्मक आहे आणि या दोन गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे जुळतात. या संशोधनात आणखी काही टप्पे गाठायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

Fly dubai Incident Marathi News: ‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
‘मला नमाज पठण करायचंय...’ को-पायलटने सांगितलं अन् काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये हल्ला; कॅप्टन स्मित मच्छार यांनी सांगितले 'ते' भयावह क्षण
Who is Hamam Al-Hamami: कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा हमाम अलहमामी कोण? इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा होता प्लॅन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Embed widget