Covid-19 : कोरोनाचा धोका वाढताच, कोविड19 ला गांभीर्याने घ्या : WHO चा इशारा
Covid-19 Case Triples Across Europe : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी कोविड 19 विषाणूच्या वाढत्या धोक्यावर चिंता व्यक्त केली आहे.
Covid-19 Case Triples Across Europe : जगभरातील कोविड-19 (Covid-19) विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 19 जुलै रोजी ही आकडेवारी जाहीर केली आहे. हे प्रमाण जगभरातील कोरोना संसर्गाच्या 50 टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. दरम्यान, दिलायादाक बाब म्हणजे अतिदक्षता विभाग (ICU) भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज (Dr. Hans Kluge) यांनी युरोपमधील वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. हंस क्लूज यांनी म्हटलं आहे की, कोरोना भयानक संभाव्य घातक आजार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपमध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण तीन पटीनं वाढलं आहे. युरोपातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेच्या चिंते भर पडली आहे.
युरोपात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय
WHO युरोपचे संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी युरोपमधील लोकांना कोरोनाबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकांनी कोरोना आजाराकडे दुर्लक्ष न करता याला गांभीर्याने घेण्याचं आवाहन केलं आहे. डॉ. क्लुगे म्हणाले की, ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे कोरोनाची नवी लाट आली आहे. अशाप्रकारे, वारंवार होणारे संक्रमण दीर्घकाळ कोरोनाचं कारण बनू शकते. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्तता आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या