(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Joe Biden Covid 19 Positive : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण, झूम कॉलद्वारे राहणार संपर्कात
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष आता नागरिकांशी झूम कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. जो बायडन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Joe Biden Covid 19 Positive : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. बायडन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. व्हाईट हाऊसकडून प्रेस नोटद्वारे कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. बायडन यांनी कोरोनाचे दोन डोस घेतले. त्यानंतर देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष आता नागरिकांशी झूम कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. जो बायडन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
US President Joe Biden tests positive for Covid-19: White House pic.twitter.com/pjzQvaFCDI
— ANI (@ANI) July 21, 2022
बायडन यांचे सचिव करिन म्हणाले, राष्ट्रध्यक्ष आयसोलेशनमध्ये असले तरी आपली सर्व कामे करणार आहे. सकाळपासून ते White House च्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहे. बायडन यांनी फायजरचे दोन डोस घेतले आहेत. त्याशिवाय त्यांनी सप्टेंबर महिन्यात पहिला बूस्टर डोस आणि 30 मार्चला अतिरिक्त डोस घेतला होता