(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगभरात कोरोनाचा कहर; काल दिवसभरात 5.75 लाख नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद
आतापर्यंत जगात 5 कोटी, 43 लाख 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 13 लाख 17 हजार 398 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Updates: जगभरात सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढत चालला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर कोरोना विषाणूंची लागण 5.43 कोटी जनतेला झाली आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 5 लाख 43 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 807 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत ही परिस्थिती अत्यंत वाईट होत चाचली आहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.
जगभरात जवळपास 13 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू
वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत जगात 5 कोटी, 43 लाख 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 13 लाख 17 हजार 398 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 78 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 51 लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील एक लाख लोकांची प्रकृती गंभीर आहे.
टॉप 10 कोरोनाबाधित देश
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1 लाख 57 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर भारताचा नंबर येतो. भारतात 88 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 41 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 29 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे.
अमेरिका: एकूण रुग्ण: 8,814,902,, मृत्यू: 129,674
भारत: एकूण रुग्ण: 8,727,900, मृत्यू: 128,686
ब्राझील: एकूण रुग्ण: 5,848,959, मृत्यू: 165,673
फ्रान्स: एकूण रुग्ण: 1,954,599, मृत्यू: 44,246
रूस: एकूण रुग्ण: 1,903,253, मृत्यू: 32,843
स्पेन: एकूण रुग्ण: 1,492,608 मृत्यू: 40,769
यूके: एकूण रुग्ण: 1,344,356, मृत्यू: 51,766
अर्जेंटिना: एकूण रुग्ण: 1,304,846, मृत्यू: 35,307
कोलंबिया: एकूण रुग्ण: 1,191,004, मृत्यू: 33,829
इटली: एकूण रुग्ण: 1,144,552, मृत्यू: 44,683
दरम्यान जगातील संक्रमित लोकांमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये भारत तिसर्या क्रमांकावर आहे. तसेच, जभरात सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण आढणारा भारत भारत चौथा देश आहे.