एक्स्प्लोर

World Coconut Day 2021 : आज साजरा केला जातोय जागतिक नारळ दिन; जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व

World Coconut Day 2021 : कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश जागतिक नारळ दिन साजरा करण्यामागे आहे.

World Coconut Day 2021 : नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्यापैकीच एक. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. 

जागतिक नारळ दिन हा सर्वप्रथम 2009 साली एशिया-पॅसिफिक प्रदेश म्हणजे आशिया-प्रशांत महासागराच्या प्रदेशातील समुदायाकडून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर नारळाच्या शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश जागतिक नारळ दिन साजरा करण्यामागे आहे. त्यामुळे नारळाच्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. 

जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं. 

जागतिक नारळ दिन साजरा करताना दरवर्षी एक थीम आखली जाते. या वर्षीच्या जागतिक नारळ दिनाची थीम ही “Building a Safe Inclusive Resilient and Sustainable Coconut Community Amid COVID-19 Pandemic & Beyond“ अशी आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या काळात एक शाश्वत नारळ  समुदाय निर्माण करण्याचं ध्येय आहे. 

नारळाचे फायदे
अगदी तहान भागवण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे. 

नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते. तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. नारळाचे पाणी रोज पिल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहतं. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget