भारतावर अॅनोफिलीस डासाची वक्रदृष्टी; 2022 मध्ये देशात मलेरियाचा उद्रेक, तब्बल 66 टक्के रुग्णांची नोंद
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2022 साली जगभरात सुमारे 24.9 कोटी जणांना मलेरियाची लागण झाल्याचा अंदाज आहे.
![भारतावर अॅनोफिलीस डासाची वक्रदृष्टी; 2022 मध्ये देशात मलेरियाचा उद्रेक, तब्बल 66 टक्के रुग्णांची नोंद WHO Malaria Report India recorded highest malaria cases in South east Asia Region in 2022 भारतावर अॅनोफिलीस डासाची वक्रदृष्टी; 2022 मध्ये देशात मलेरियाचा उद्रेक, तब्बल 66 टक्के रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/24cf457d8442e2d001aa653a034ce2e11676134366952109_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात साथीचा आजारांचा प्रादुर्भाव कायम आहे. मलेरिया, (Malaria) डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनिया आदी आजारांचा फैलाव वाढला आहे. जगात 2022 मध्ये नोंदवलेल्या 52 लाख मलेरियाच्या रुग्णांपैकी 66 टक्के रुग्ण भारतात आढळल्याची माहिती माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) ही आकडेवारी दिली आहे. दक्षिण पूर्व आशियातील कोणत्याही देशासाठी ही संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही 2020 सालची आकडेवारी असून सध्या देशात मलेरिया आटोक्यात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) 2023 चा वर्ल्ड मलेरीया रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2022 साली जगभरात सुमारे 24.9 कोटी जणांना मलेरियाची लागण झाल्याचा अंदाज आहे. 2019 साली 23.3 कोटी जणांना मलेरीयाची जगभरात लागण झाली होत. कोरोना महामारीची घोषणा होण्यापूर्वीच 1.6 कोटी मलेरीयाचे रुग्ण होते. कोविडमुळे झालेला औषधांचा तुटवडा, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील विलंब, हवामान बदलांचे परिणाम, संसाधनांची मर्यादा यासारख्या वाढत्या धोक्यांचा सामना मलेरीया आजारावर नियंत्रण मिळवताना त्यावेळी करावा लागला होता. हवामान बदलांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामही मलेरियाच्या वाढत्या प्रसारावर झाल्याचं अहवालात दिसून येत आह.
पाकिस्तानात देखील मलेरियाच्या रुग्णात वाढ
2022 मध्ये मलेरीयामुळे झालेल्या मृत्यूपैकी 94 टक्के मृत्यू इंडोनेशियासह भारतात झाल्याते आकडेवारीवरुन समोर आले आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये मलेरीया संसर्गाची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्ताननंतर इथिओपिया, नायजेरिया, युगांडा आणि पापुआ न्यू गिनीमध्ये देखील मलेरीयाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मलेरियाच्या रुग्णसंख्येत 2023 मध्ये घट
भारतात जरी यावर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळालं असलं तरी गेल्या कित्येक दशकांपासून मलेरिया हे एक आव्हान म्हणून देशासमोर उभं आहे. भारताचा समावेश जगातील सर्वात जास्त मलेरियाच्या रुग्णांची संख्या असलेल्या देशांत होतो. आफ्रिका खंडाच्या बाहेरील देशांचा विचार करता जगाच्या तुलनेत भारतात मलेरियाची संख्या आणि त्यापासून होणाऱ्या मृत्यूची संख्या ही 70 टक्के इतकी आहे. आशियाई देशातील वाढत्या मलेरियाच्या प्रादुर्भावानंतर पुन्हा एकदा सर्व देशांनी एकत्र उभं राहण्याची आवश्यकता आहे. जगातील देशांनी मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :
Malaria Vaccine : मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मंजुरी, R21/Matrix M लस स्वस्त आणि प्रभावी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)