Covid प्रमाणेच Monkeypox लाही जागतिक आणीबाणी घोषित केली जाणार? WHO ने बोलावली आपत्कालीन बैठक
WHO Emergency Meeting : या बैठकीत मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाला जागतिक आणीबाणी घोषित करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
WHO Emergency Meeting : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आज आपत्कालीन समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाला जागतिक आणीबाणी घोषित करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये हा रोग पसरल्यानंतरच WHO ने कारवाई करण्याचे ठरवले. असे झाल्यास मंकीपॉक्सच्या कोरोना महामारीनंतर दुसरी जागतिक आणीबाणी लागू होईल.
The first Emergency Committee meeting regarding the multi-country #monkeypox outbreak is currently ongoing https://t.co/1zoGHShNb0 pic.twitter.com/zyWlOu0uE2
— World Health Organization (WHO) (@WHO) June 23, 2022
मंकीपॉक्स आतापर्यंत 42 देशांमध्ये पसरला आहे
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने आत्तापर्यंत 42 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 3,300 हून अधिक प्रकरणांची पुष्टी केली आहे जिथे संबंधित विषाणू सामान्यतः दिसत नाही. यापैकी 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणे युरोपमध्ये आहेत. दरम्यान, या वर्षी आफ्रिकेत 1,400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये 62 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मंकीपॉक्सवरून श्वेत-अश्वेत वाद
नायजेरियन विषाणूशास्त्रज्ञ ओयेवाले तोमोरी म्हणाले की, जर WHO ला खरोखरच मांकीपॉक्सच्या प्रादुर्भावाची चिंता होती, तर त्याने काही वर्षांपूर्वी आपल्या आपत्कालीन समितीची बैठक बोलावली असती, जेव्हा नायजेरियामध्ये 2017 मध्ये हा रोग पुन्हा उद्भवला आणि याचे कारण कोणालाच माहित नाही. अचानक शेकडो रुग्णसंख्या कशी वाढली? ते म्हणाले की डब्ल्यूएचओने आपल्या तज्ञांना तेव्हाच बोलावले आहे, जेव्हा श्वेतवर्णीय लोकांच्या देशांमध्येही हा आजार उद्भवला आहे. यानंतर श्वेत-अश्वेत वाद निर्माण झाला आहे.
WHN कडून महामारी घोषित, काय आहे धोका?
दरम्यान, मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता जागतिक आरोग्य समूहानं (WHN - World Health Organization) मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर पाऊलं उचलावी लागतील. याचा मूळ उद्देश जगभरातील देशांना मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. कांजिण्यांच्या तुलनेत यासंबंधित मृत्यूचं प्रमाण खूपच कमी असले तरी, याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास लाखो लोक मृत्यूमुखी होण्याची शक्यता आहेत. शिवाय अनेक लोक अंध आणि अपंग होतील, असंही संघटनेनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला! 58 देशांमध्ये प्रसार, WHN कडून महामारी घोषित, काय आहे धोका? जाणून घ्या
Covid19 : देशात 100 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण वाढ, एका दिवसात 17,336 नवीन कोरोनाबाधित
भारतात मंकीपॉक्स रोगाचा प्रवेश? गाझियाबादमधील 5 वर्षीय मुलीमध्ये लक्षणं आढळली
Monkeypox : मंकीपॉक्स नियंत्रित करणं शक्य नाही? WHO चं मोठं वक्तव्य