एक्स्प्लोर

भारतात मंकीपॉक्स रोगाचा प्रवेश? गाझियाबादमधील 5 वर्षीय मुलीमध्ये लक्षणं आढळली 

Monkeypox : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स रोगाचा संशयित रुग्ण भारतात आढळला आहे

Monkeypox : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स रोगाचा संशयित रुग्ण भारतात आढळला आहे. दिल्लीजवळील गाझियाबादमधील एका पाच वर्षीय मुलींमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळली आहेत. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय मुलींमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या मुलीचे नमुने तात्काळ घेण्यात आले असून टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पाच वर्षीय मुलीच्या त्वचेला खाज येत आहे. तसेच तिच्या शरीरावर व्रणही दिसून येत आहेत.  

गाझियाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले आहेत. पुढील 24 तासांत तपासणीचा अहवाल येईल. सध्या पाच वर्षीय चिमुकलीला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच या मुलीमध्ये आढळून आलेली लक्षणे इतर आजाराचीही असू शकतात... पण खबरदारी घेत तीला विलगीकरणात ठेण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.  

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या पाच वर्षाच्या चिमुकलीने अथवा तिच्या कुटुंबियांनी मागिल महिन्याभरात विदेशवारी केलेली नाही, अथवा विदेशातून त्यांच्याकडे कुणी आलेलं नाही.  त्या चिमुकलीमध्ये मंकीपॉक्स रोगाची लक्षणे आढळली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कानासंदर्भातील आजाराच्या उपचारासाठी 23 मे रोजी पाच वर्षीय चिमुकली ईएनटी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी डॉक्टरांना त्या चिमुकलीच्या त्वचेवर जास्त पुरळ आणि खाज यासारख्या गोष्टी निदर्शणास आल्या. डॉक्टरांनी याची गंभीर दखल घेत याची माहिती सरकारी रुग्णालयात पोहचवली. त्यानंतर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, त्या मुलीचे नमुणे तपासणीसाठी पाठवले आहेत.  

मंकीपॉक्स रोगाची काय आहेत लक्षणे?
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

संक्रमणाचा धोका किती?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रीय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.

महत्त्वाच्या बातम्या

US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Elections Results 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांना पाठिंबा दिला होता, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Ashish Vidyarthi On Divorce At 55: 24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
Embed widget