Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला! 58 देशांमध्ये प्रसार, WHN कडून महामारी घोषित, काय आहे धोका? जाणून घ्या
Monkeypox Pandemic : मंकीपॉक्स विषाणू 58 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत 3 हजार 417 लोकांना याचा संसर्ग झाला आहे.
Monkeypox Pandemic 2022 : जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus Pandemic) पाठोपाठ मंकीपॉक्सचा संसर्ग (Monkeypox Virus) वाढताना दिसत आहे. जगभरातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचं संक्रमण झालं आहे. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता जागतिक आरोग्य समूहानं (WHN - World Health Organization) मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर पाऊलं उचलावी लागतील.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याचा मूळ उद्देश जगभरातील देशांना मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. कांजिण्यांच्या तुलनेत यासंबंधित मृत्यूचं प्रमाण खूपच कमी असले तरी, याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास लाखो लोक मृत्यूमुखी होण्याची शक्यता आहेत. शिवाय अनेक लोक अंध आणि अपंग होतील, असंही संघटनेनं म्हटलं आहे.
The first Emergency Committee meeting regarding the multi-country #monkeypox outbreak is currently ongoing https://t.co/1zoGHShNb0 pic.twitter.com/zyWlOu0uE2
— World Health Organization (WHO) (@WHO) June 23, 2022
जागतिक आरोग्य समूहाचे (WHN) सह-संस्थापक यानिर बार-यम यांनी सांगितलं की, मंकीपॉक्स साथीचा संसर्ग 2022 अखेरपर्यंत वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा त्वरित कारवाई करून आपण याचा उद्रेक नियंत्रित करता येईल. अशा प्रकारे आपण परिस्थिती बिघडण्यापासून रोखू शकतो. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही मंकीपॉक्सला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे.
मंकीपॉक्सची सद्याची स्थिती
सध्या मंकीपॉक्स व्हायरसल 58 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत 3 हजार 417 जणांना याची लागण झाली आहे. याचा सर्वाधिक संसर्ग अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या