एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेव्हा किम जोंग अमेरिकेच्या रस्त्यावर फिरताना दिसतो...!
उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेत दिसला आणि लोक अवाक् झाले. काहींनी भररस्त्यात उभं राहून किम जोंगला टकामका पाहायला लागले तर कुणी त्याच्यासोबत सेल्फीही काढला. इतकंच नाही, कुणीतरी त्याला रॉकेट मॅन नावानंही हाका मारल्या.
न्यूयॉर्क : उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन अमेरिकेत दिसला आणि लोक अवाक् झाले. काहींनी भररस्त्यात उभं राहून किम जोंगला टकामका पाहायला लागले तर कुणी त्याच्यासोबत सेल्फीही काढला. इतकंच नाही, कुणीतरी त्याला रॉकेट मॅन नावानंही हाका मारल्या.
त्याचं असं झालं की, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारखा दिसणारा एक व्यक्ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर 10 तास फिरत होता. तब्बल 10 तास न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरुन फेरफटका मारल्यावर हा डुप्लिकेट महाशय ट्रम्प टॉवरजवळ पोहोचला आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी आग्रह धरु लागला.
अखेर ट्रम्प टॉवरमधल्या सुरक्षा रक्षकांनी रिसेप्शन भागातच या तोतया किम जोंग महाशयांना थांबवलं आणि साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. हा सर्व खटाटोप एका प्रँक व्हिडिओसाठी करण्यात आला होता. आता हा व्हिडिओ जगभरातल्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement