10 मुलांना जन्म देणाऱ्या महिलेस 13 लाख रुपये दिले जाणार, व्लादिमीर पुतिन यांची 'मदर हिरोईन' योजना
Russia Ukraine War: कोरोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम रशियाच्या लोकसंख्येवर झाला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी एक अजब योजना आणली आहे.
Russia Ukraine War: कोरोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम रशियाच्या लोकसंख्येवर झाला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी एक अजब योजना आणली आहे. पुतिन यांनी रशियन महिलांना 10 मुले जन्माला घालण्यासाठी आणि ते जगावे म्हणून 13,500 पौंड देण्याची घोषणा केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात 50,000 सैनिकांचा मृत्यू
या योजनेला 'मदर हिरोईन' असे नाव देण्यात आले आहे. पुतिन यांनी रशियाची कमी होत चाललेली लोकसंख्या वाढावी म्हणून ही योजना आणल्याचं सांगितलं जात आहे. रशियन राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टाइम्स रेडिओवर बोलताना ही माहिती दिली. याच दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात 50,000 हून अधिक रशियन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशात कोरोनामुळे हजारो मृत्यूही झाले आहेत. अशातच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 'मदर हिरोईन' योजना ही याशीच जोडून पाहिली जात आहे.
दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी दिले जातील पैसे
डॉ. जेनी मॅथर्स म्हणाल्या आहेत की, "पुतिन यांचं म्हणणं आहे की मोठे कुटुंब असलेले लोक अधिक देशभक्त असतात." म्हणजेच देशभक्तीबद्दल बोलताना ते महिलांना अधिक मुलं जन्माला घालण्याचा संदेश देत आहेत. तसेच असं ही बोलले जात आहे की, युक्रेनसोबत युद्धाचे संकट वाढत असताना रशियाची लोकसंख्या वाढावी म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुतीन यांच्या या योजनेनुसार, रशियन महिलांना 10 लाख रूबल म्हणजेच 13.5 हजार पौंड दिले जाईल. महिलेच्या दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी तिला हे पैसे दिले जातील. पण रशियन सरकारची अट अशी आहे की, पहिले नऊ मुलं देखील जगले पाहिजेत.
दरम्यन, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. हे युद्ध इतके दिवस चालेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. यातयुक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश मागे हस्तन्यास तयार नाही. यामध्येच व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेमुळे युद्ध लांबले जात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले आहेत की, जगात सर्वात शक्तिशाली देश हा फक्त अमेरिकाच राहावा म्हणून ते असं करत आहात. मॉस्कोमध्ये सुरक्षा परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना पुतिन यांनी उघडपणे अमेरिकेवर निशाणा साधला. युक्रेनला रशियाच्या विरोधात अमेरिका हा सर्वात मोठा शस्त्रास्त्रे पुरविणारा देश आहे.