एक्स्प्लोर

चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार?

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी केलेल्या एका वक्तव्यात जागतिक राजकारणाचं बदलतं समीकरण दडलं आहे. युरोपमध्ये सैन्य कमी करुन अमेरिका आता दक्षिण पूर्व आशियात आपलं सैन्य वाढवणार आहे.

नवी दिल्ली : भारत चीन सीमेवरचा वाद अद्याप निवळलेला नाहीय. त्यातच या घटनेनंतर अमेरिकेनं आशियाबाबत एक मोठा लष्करी निर्णय जाहीर केलाय. युरोपऐवजी आशियामध्ये अमेरिका सैन्य तैनाती वाढवणार आहे. या घटनेचा मोठा परिणाम जागतिक राजकारणावर होणार आहे, शिवाय ही नव्या शीतयुद्धाची नांदी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

भारत चीन सीमेवरचा तणाव वाढलेला असतानाच आता चीनी ड्रॅगनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी केलेल्या एका वक्तव्यात जागतिक राजकारणाचं बदलतं समीकरण दडलं आहे. युरोपमध्ये सैन्य कमी करुन अमेरिका आता दक्षिण पूर्व आशियात आपलं सैन्य वाढवणार आहे. चीनच्या पब्लिक लिबरेशन आर्मीनं काही आगळीक केल्यास त्याला उत्तर म्हणून हे करावं लागतंय, असा थेट इशारा ट्रम्प यांच्या विदेश मंत्र्यांनी दिला आहे.

अमेरिका सध्या जर्मनीतलं आपलं सैन्य कमी का करतेय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर उत्तर देताना माईक पोम्पियो यांनी आपले इरादे स्पष्ट केले. चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या हरकतींमुळे भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ चायना सी मध्ये धोका वाढलाय. त्यामुळेच योग्य वेळ आल्यावर चीनला उत्तर देण्यासाठी म्हणून ही तैनाती गरजेचं असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय.

भारत-चीन सीमेवर 6 मे पासून वाद सुरु झाला. सीमेवरच्या कुठल्याही वादात भारतानं त्रयस्थाची गरज नाही, अशी भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. अमेरिकेनंही आत्तापर्यंत या वादात भारताची बाजू घेणारं कुठलं वक्तव्य केलेलं नव्हतं. पण आता मात्र दक्षिण आशियातल्या एकूण स्थितीवरुन अमेरिकेनं चीनवर नजर ठेवणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. साहजिकच जर का भारत चीनमध्ये ठिणगी पडली तर आपल्या बाजूनं कोण उभं राहणार या प्रश्नाचं उत्तर त्यामुळे अमेरिका असणार का ही देखील चर्चा सुरु झालीय.

जर्मनीमध्ये आत्तापर्यंत अमेरिकेची 30 हजार लष्करी पथकं तैनात होती. त्यातली जवळपास दहा हजार पथकं अमेरिका माघारी बोलावतेय. दक्षिण आशियात पाय रोवण्यात अमेरिका कुठला दानधर्म करत नाहीय. त्यांनाही स्वत:चे काही फायदे वसूल करायचे आहेतच. त्यामुळे अमेरिकेच्या या लष्कर तैनातीमुळे एक नवं शीतयुद्ध सुरु होतं का, हे पाहावं लागेल.

कोरोनानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट चीनविरोधात जाहीर वक्तव्यं केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्यांनी चीनवरुन सुनावलं. शिवाय हाँगकॉँगमधल्या चीनच्या दडपशाहीबद्दलही अमेरिका वारंवार निषेध नोंदवत आलीय. त्यात भारत-चीन सीमेवरच्या रक्तरंजित घटनेनं अमेरिकेला पुन्हा चीनविरोधात उभं राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे उद्या जर भारत चीनमध्ये काही विपरीत घडलंच तर त्यानिमित्तानं दक्षिण आशियाच्या राजकारणात अमेरिका हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेची आशियातली सैन्य तैनाती हे त्याचंच निदर्शक म्हणावी लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RBI : अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला दिलासा, आता आरबीआय कर्जदारांसाठी मोठा निर्णय घेणार? लवकरच बैठक
केंद्रानं 12 लाखांपर्यंत कर सवलत दिली, आता आरबीआयकडे मध्यमवर्गाचं लक्ष, रेपो रेट बदलणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, युवराज सिंग म्हणाला तुझा अभिमान वाटतो, युवा खेळाडू म्हणतो, ते आनंदी....
मला तुझा अभिमान वाटतो, युवराज सिंगचं शिष्याच्या फटकेबाजीवर ट्विट, अभिषेक शर्मा म्हणाला युवी पाजी आनंदी असतील...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 03 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPruthviraj Mohol  wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपटShivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला दिलासा, आता आरबीआय कर्जदारांसाठी मोठा निर्णय घेणार? लवकरच बैठक
केंद्रानं 12 लाखांपर्यंत कर सवलत दिली, आता आरबीआयकडे मध्यमवर्गाचं लक्ष, रेपो रेट बदलणार?
Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Raj Thackeray : मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
मराठीसाठी आमच्या पद्धतीने जे काही करू त्याला साथ द्या, आमच्यावर केसेस टाकू नका; राज ठाकरेंचं आवाहन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, युवराज सिंग म्हणाला तुझा अभिमान वाटतो, युवा खेळाडू म्हणतो, ते आनंदी....
मला तुझा अभिमान वाटतो, युवराज सिंगचं शिष्याच्या फटकेबाजीवर ट्विट, अभिषेक शर्मा म्हणाला युवी पाजी आनंदी असतील...
Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारीक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Embed widget