Pizza: 'ही' कंपनी देत आहे पिझ्झा आणि चीज खाण्यासाठी भरघोस पैसे; अनेकांना देत आहे नोकऱ्या
World News: एका विद्यापीठाने एक वेगळी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे, ज्यात पिझ्झा आणि चीज खाल्ल्यानंतर त्याची चव सांगावी लागणार आहे आणि या कामाचा मोबदला म्हणून तुम्हाला भरघोस पगार देखील मिळेल.
World Facts: आपण कुठेही बाहेर जेवायला गेल्यावर आपल्याला जेवणाचे पैसे मोजावे लागतात. पण एक युनिव्हर्सिटी असा जॉब ऑफर करत आहे, ज्यात एखादा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडीची नोकरी हवी असते आणि त्यात, खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या लोकांना तर अशी इच्छा असते की, जिथे भरपूर चविष्ट पदार्थ खाण्याची संधी मिळेल अशाच एखाद्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळावी.
प्रत्येकाच्या नोकरीबद्दलच्या इच्छा पूर्ण होतीलच असं नाही. बऱ्याचदा चांगला पगार मिळतो, पण नोकरी मनासारखी वाटत नाही. चांगला पगार आणि चांगली नोकरी मिळाली तर ऑफिसचं वातावरण आवडत नाही, अशा सर्व प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. पण खाण्याचे शौकीन असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त नोकरी समोर आली आहे. जर तुम्ही पिझ्झा (Pizza), चीज (Cheese) आणि दुग्धजन्य पदार्थ (Milk Products) खाण्याचे शौकीन असाल, तर अशा लोकांसाठी एक छान काम समोर आलं आहे, ज्यात तुम्हाला पिझ्झा, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या वस्तू दिवसभर चाखायच्या आहेत आणि त्याचा रिव्ह्यु द्यायचा आहे, या बदल्यात भरघोस पगारही मिळणार आहे.
नक्की काय आहे नोकरी?
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन सेंटर फॉर डेअरी रिसर्च (Dairy Forage Research Center) अशा लोकांना कामावर ठेवू इच्छित आहे, जे पदार्थांची चव घेऊन त्याचा दर्जा ओळखण्यात एक्सपर्ट आहेत, यासाठी पदार्थाची चाचणी (Food Testing) घ्यावी लागते. कोणताही पदार्थ चाखल्यानंतर लगेच त्याची चव कशी आहे, हे सांगावे लागते. दुसऱ्या शब्दात, आपण त्यांना डेअरी चव परीक्षक देखील म्हणू शकता. त्यांना प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ बनवले जाईल. जॉब प्रोफाईलनुसार, असे लोक यासाठी योग्य असतील ज्यांना विविध पदार्थांच्या चव माहित आहेत आणि त्याबद्दल जे अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. पदार्थाची रचना, चव आणि सुगंध यांच्या वैशिष्ट्यांबद्दल पॅनेलमध्ये चर्चा करू शकतात.
दर आठवड्याला खावे लागतील 12 पिझ्झा
नोकरीच्या जाहिरातीनुसार, या पॅनेलमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांना एका आठवड्यात 12 पिझ्झा, 24 चीजचे नमुने चाखण्यास सांगितले जाऊ शकतात. त्यांनी सांगितलेली चव नोट केली जाईल आणि ती अंतिम मानली जाईल. पॅनल चर्चा, प्रशिक्षण सत्र आणि इतर कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी व्हावे लागेल. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार एक सत्र तीन तासांचे असेल. पॅनेलच्या सदस्यांना दर आठवड्याला तीन सत्रांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक असेल. प्रत्येक तीन तासाच्या सत्रासाठी $45, म्हणजेच 3 हजार 700 रुपये दिले जातील, यात अनुभवी पॅनेल सदस्यांना प्राधान्य दिलं जाईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळानुसार त्याला दुग्ध संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )