एक्स्प्लोर
5 जूननंतर अमेरिका भारताला व्यापारात कोणतीही सूट देणार नाही, ट्रम्प सरकारचा नवा निर्णय
अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

Getty Images)
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेकडून भारताला व्यापारासाठी दिलेली प्रोत्साहन योजना 5 जूनपासून बंद करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारताला जीएसपी (जनरलाईज सिस्टिम ऑफ प्रेफरन्स) दर्जा दिला होता. हा दर्जा आता हटवण्यात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत म्हटले आहे की, भारताने अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारपेठांमध्ये समान संधी देण्याचे आश्वासन दिलेले नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी मार्चमध्ये टर्की आणि भारताचा जीएसपी दर्जा काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे.
अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारतातील विविध प्रतिबंधांमुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान होत आहे. आमच्या वस्तूंना समान दर्जा दिला जात नसल्यामुळे व्यापारावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. तसेच भारत जीएसपीचे मापदंड पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे.
भारतीय वाणिज्य सचिव अनूप वधावन यांनी याबाबत म्हटले आहे की, अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारताच्या अमेरिकेमधील 5.6 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही.
दरम्यान अमेरिकी काँग्रेसच्या 24 सदस्यीय समितीने प्रशासनाला 3 मे रोजी एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये भारताचा जीएसपी दर्जा काढून घेण्याची विनंती करण्यात आली होती.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement



















