एक्स्प्लोर

MNS Diwali Dipotsav Mumbai: राज ठाकरेंनी सुरु केलेल्या दीपोत्सवाचं श्रेय सरकारच्या पर्यटन विभागाने लाटलं, मनसेची खरमरीत पोस्ट, म्हणाले?

MNS Diwali Deepotsav Mumbai: महायुती सरकारच्या पर्यटन खात्याने राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये सुरु केलेल्या दीपोत्सवाची जाहिरातबाजी केली आहे. मात्र, यामध्ये मनसेचा उल्लेख नाही.

MNS Diwali Deepotsav Mumbai: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या मुंबईच्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सव हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. मनसेने शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) केलेली आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी दूरवरुन लोक याठिकाणी येत आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये दररोज प्रचंड गर्दी होत आहे. गेली अनेक वर्षे मनसे (MNS) शिवाजी पार्कमध्ये ही रोषणाई करत असली तरी त्याचे श्रेय घेणारी बॅनरबाजी मात्र राज यांच्याकडून कधीही करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला आहे. पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहिली नसेल तर तुम्ही दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागेला मुकत आहात, असे म्हटले आहे. पर्यटन खात्याच्या या ट्विटर पोस्टवरुन मनसेने त्यांची कानउघडणी केली आहे. (MNS Deepotsav in Dadar)

Raj Thackeray MNS: मनसेच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे... दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली 13 वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे... हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील... 

पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता... नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . . 

आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं ! ! !

आणखी वाचा

मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MCA Election: '१५० क्लब नियमबाह्य घेतले', श्रीपाद हळबेंच्या आरोपानं मुंबई क्रिकेट निवडणुकीत नवा वाद
Job Protest:'नोकरी द्या!',नाशिकमध्ये तरुणांचा एल्गार,Ramkund मध्ये स्नान करून Eidgah मैदानावर उपोषण
Land Grab Row: 'हक्कासाठी एकत्र या', संग्राम जगतापांविरोधात गुप्तीनंद महाराजांचे जैन समाजाला आवाहन
Central Team Visit: टॉर्चच्या प्रकाशात पथकाची पाहणी, Solapur मधील नुकसानीचा अंधारातच पंचनामा?
Maharashtra Politics: 'सरकार दगाबाजरे', Uddhav Thackeray यांचा Marathwada दौरा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget