एक्स्प्लोर
Bhai Jagtap on BMC Election : काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ठाकरे बंधूंसोबत युतीला नकार?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'राज ठाकरे (Raj Thackeray) तर सोडाच, आम्ही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसोबतही आघाडीत लढणार नाही', असे स्पष्ट वक्तव्य भाई जगताप यांनी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची मनसे आणि शिवसेनेसोबत युती करण्याची मानसिकता नाही, असेही ते म्हणाले. जगताप यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मनसेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला, तर शिवसेनेच्या (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत अनेक नेत्यांनी स्वबळाचा आग्रह धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















