एक्स्प्लोर
BMC Election : 'राज ठाकरेच काय, Uddhav Thackeray सोबतही नाही', Bhai Jagtap यांचा स्वबळाचा नारा
काँग्रेस (Congress) नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य करून महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) खळबळ उडवून दिली आहे. 'राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील आघाडीत लढणार नाही', असे भाई जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची आहे आणि पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (Political Affairs Committee) बैठकीत सर्वानुमते हाच निर्णय घेण्यात आला आहे, असेही जगताप म्हणाले. भाई जगताप यांच्या या 'एकला चलो रे'च्या भूमिकेमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections) महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
















