एक्स्प्लोर

Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी

Diwali Padwa Saras Baug Pune: पुण्यातील सारसबागेत यंदा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे दिवाळी पाडवा पहाटेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला तरुण-तरुणी मोठ्या संख्येने आले आहेत.

Diwali Padwa Saras Baug Pune: हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट (Diwali Pahat 2025) कार्यक्रमाला बुधवारी गालबोट लागले. धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटातील तरुण मुलं एकमेकांवर धावून गेली. मात्र, सारस बागेत (Saras Baug) तैनात असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला. ही घटना वगळता सारसबाग येथील पाडवा पहाट कार्यक्रमात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. (Pune News)

पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पहायला मिळत आहे. बुधवारी पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली. सारसबाग मध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषा धारण करत तरुणाई ही त्यांच्या मित्रांसोबत या ठिकाणी पाडव्याचे निमित्त असल्याने दर वर्षी एकत्र येतात. 

सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाटेचा कार्यक्रम यंदा आणखी एका कारणामुळे चर्चेत होता. गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत पाडवा पहाटेचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, यंदा सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यांना कंटाळून आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune Fire news: पुण्यात लक्ष्मीपूजनाला अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना

१}  ०५•१२ - हडपसर, गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग (हडपसर अग्निशमन वाहन)

२}  ०७•२० - वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग (वारजे व कोथरूड अग्निशमन वाहन)

३}  ०७•४५ - नरहे गाव, झील  कॉलेजमागे एका इमारतीत गच्चीवर आग (नवले अग्निशमन वाहन) 

४}  ०७•५८ - काळेपडल, गजानन महाराज मंदिर जवळ गच्चीवर आग (काळेपडल अग्निशमन वाहन) 

५}  ०७•५९ - बुधवार पेठ, दत्त मंदिर जवळ गच्चीवर आग (कसबा अग्निशमन वाहन) 

६}  ०८•०४ - कसबा पेठ, साततोटी पोलिस चौकीमागे , कागदीपुरा येथे एका इमारतीत चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन) 

७} ०८•१० - विमान नगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग (येरवडा अग्निशमन वाहन) 

८} ०८•२२ - मांजरी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला गवताला आग (हडपसर अग्निशमन वाहन)

९} ०८•२५ - भवानी पेठ क्षेञिय कार्यालय जवळ गॅलरीमध्ये जाळीला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन) 

१०} ०८•२७ - नगर रस्त्यावर वडगाव शेरी, गणेश नगर येथे एका दुचाकी वाहनाला आग (खराडी अग्निशमन वाहन) 

११} ०८•२९ - धानोरी, कलवड वस्ती येथे मोकळ्या मैदानात कचरयाला आग (धानोरी अग्निशमन वाहन)

१२} ०८•३५ - वारजे, तपोधाम कमानी जवळ एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग ( वारजे अग्निशमन वाहन)

१३} ०८•३६ - कसबा पेठ, कागदीपुरा येथील नागझरीमध्ये कचऱ्याला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)

१४} ०८•३६ - धायरी फाटा येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग (नवले अग्निशमन वाहन)

१५} ०८•४० - विमान नगर, जीवन सुपर मार्केट जवळ एका गोडाऊनमध्ये आग (येरवडा अग्निशमन वाहन परस्पर)

१६} ०८•४६ - शुक्रवार पेठ, फडगेट पोलिस चौकी समोर घराच्या छतावर आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

१७} ०८•५१ - घोरपडी पेठ, मोठा गणपती मंडळ येथे चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

१८} ०८•५४ - गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथे एका इमारतीत गच्चीवर आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)

१९} ०९•०२ - बाणेर, छञपती शिवाजी महाराज पुतळा नजीक एका घरामध्ये आग (बाणेर अग्निशमन केंद्र वाहन)

२०} ०९•२५ - बी टी कवडे रोड एका इमारतीत पार्किंगमध्ये आग (बी टी कवडे रोड अग्निशमन वाहन) 

२१} ०९•२६ - वानवडी, कामठे उद्यानात जवळ एका वर्कशॉपच्या पञ्यावर प्लास्टिकला आग (कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन)

२२} ०९•२८ - बाणेर, पॅनकार्ड क्लब रोड येथील इमारतीत एका घरामध्ये आग (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)

२३} ०९•३८ - मंगळवार पेठ, भीमनगर कमान येथे वाड्यामध्ये घराला आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)

२४} ०९•४५ - विश्रांतवाडी, कळस, गंगाकुंज सोसायटीमध्ये दुसर्‍या मजल्यावर घरामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)

२५} ०९•५५ - येरवडा, चिञा चौकात एका घरात आग (येरवडा अग्निशमन केंद्र वाहन) 

२६} ०९•५७ - सोलापूर बाजार येथे घरात पोटमाळ्यावर आग (पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन केंद्र वाहन)

२६} १०•०२ - मार्केट यार्ड, गेट नंबर नऊ जवळ झाडाला आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)

२७} १०•०४ - दारुवाला पुल, देवजी बाबा चौकात घराच्या छतावर आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन) 

२८} १०•०६ - वडगाव बुद्रुक येथे मोकळ्या मैदानात कचरयाला आग (सिंहगड अग्निशमन केंद्र वाहन)

२९) १०•०८ - धानोरी, भैरव नगर येथे झाडाला आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)

३०} १०•११ - सिंहगड रोड, नवशा मारुती मंदिर, सावित्रीबाई फुले वसाहत येथे घरामध्ये आग  (जनता वसाहत अग्निशमन केंद्र वाहन)

३१} १०•१६ - सदाशिव पेठ, उद्यान प्रसाद कार्यालय एका इमारतीत पार्किंगमध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

३२} १०•१९ - सिंहगड रोड, मधुकर हॉस्पिटल जवळ एका घरात आग (नवले अग्निशमन केंद्र वाहन)

३३} १०•२४ - बाणेर-सुस रोड येथे एका इमारतीत अकराव्या मजल्यावर घरात आग (बाणेर अग्निशमन केंद्र वाहन परस्पर) 

३४} १०•२६ - सिंहगड रोड, हिंगणे चौक येथे घरात आग (जनता व सिंहगड अग्निशमन केंद्र वाहन परस्पर)

३५} १०•४० - काळेपडल, तुकाई टेकडी जवळ गवताला आग (काळेपडल अग्निशमन केंद्र वाहन)

३६} १०•४९ - बिबवेवाडी, कोणार्क गार्डन सोसायटीत पहिल्या मजल्यावर घरात आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन व मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर) 

३७} १०•५२ - काशेवाडी, गल्ली क्रमांक १० येथे कचऱ्याला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)

३८} ११•१० - कोथरूड, म्हाडा कॉलनी जवळ केबलला (वायर) आग (कोथरूड अग्निशमन केंद्र वाहन)

३९} ११•२६ - दांडेकर पूल चौक येथे दुकानात आग (जनता व एरंडवणा अग्निशमन केंद्र वाहन आणि मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वॉटर टँकर)

४०} ११•४० - नाना पेठ भाजी मंडई येथे एका इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाला आग ( मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन) 

४१} ११•४५ - औंध, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ इमारतीत चौथ्या मजल्यावर घरामध्ये आग (औंध अग्निशमन केंद्र वाहन) 

४२} ११•४८ - धायरी, डिएसके विश्व येथे बंद घरामध्ये आग (नवले अग्निशमन केंद्र वाहन)

आणखी वाचा

शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
Embed widget