एक्स्प्लोर

US President Joe Biden : मिस्टर प्रेसिडेंट ज्यो बायडन...! 46 वे राष्ट्रपती म्हणून विराजमान, पहिल्या भाषणात बायडन म्हणाले...

US Inauguration Day 2021 : अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी शपथ घेतील. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडला.

US Inauguration Day 2021 Livestream: अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी शपथ घेतील. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडला. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांना वेस्ट फ्रंटमध्ये शपथ दिली. बायडन यांनी आपल्या कुटुंबातील 127 वर्षांपूर्वीच्या 'बायबल'ला साक्षी ठेवून शपथ घेतली. यादरम्यान त्यांची पत्नी जिल बायडन आपल्या हातात बायबल घेऊन उभ्या होत्या. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून बायडन यांनी शपथ घेतली.

एकजुटीनं अमेरिकेला एकत्र आणण्याचं काम करु- बायडन  यावेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले की, एकजुटीनं अमेरिकेला एकत्र आणण्याचं काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. अमेरिकेत विकास घडवण्यासाठी मेहनतीनं काम करु. देशांतर्गत दहशतवादाला हरवण्याचं मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले. मी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचंही अभिनंदन करतो. मी संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्रपती आहे, कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही, असंही ते म्हणाले.

US Inauguration Day 2021 Schedule: जो बायडन आज घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; 'असा' असणार सोहळा

डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस सोडलं डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.

कमला हॅरिस की, जो बायडन? कोण घेणार पहिली शपथ? अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीबाबतच्या रंजक गोष्टी

कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील रोचक गोष्ट

कमला हॅरिस आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती ठरल्या. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या लॅटिन सदस्य न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर पदाची शपथ दिली. सोटोमेयर यांनीच बायडन यांना 2013 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस दोन बायबल साक्षी ठेवून शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोड बंदोबस्त

शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला होता. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 25 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget