एक्स्प्लोर
अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या आकाशात मॉक ड्रिल
अमेरिकेचे दोन B-1BS आणि चार F-35BS ही लढाऊ विमानं तर दक्षिण कोरियाचे चार F-15K या फायटर जेट या युद्ध सरावात सहभागी झाले होते.
![अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या आकाशात मॉक ड्रिल Us Flies Bombers Over Korean Peninsula For Drill Report अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या आकाशात मॉक ड्रिल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18225351/trump-1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्याँगयांग (उत्तर कोरिया) : जगाची डोकेदुखी बनलेल्या उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगला वठणीवर आणण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला.
अमेरिकेचे दोन B-1BS आणि चार F-35BS ही लढाऊ विमानं तर दक्षिण कोरियाचे चार F-15K या फायटर जेट या युद्ध सरावात सहभागी झाले होते. तर उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्याने युद्धाचे ढग जमा झाले आहेत.
उत्तर कोरियाने चालवलेली शस्त्रास्त्रांची स्पर्धा तात्काळ थांबवावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेकडून वारंवार देण्यात येत आहे. मात्र तरीही उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे उत्तर कोरियावर वचक बसवणे हा या युद्ध सरावामागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या :
जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!
उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची चाचणी
युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध
अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)