(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Niagara Falls : जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला, अमेरिकेत रक्त गोठवणारी थंडी
Niagara Fall Frozen : जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणारा जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला आहे. अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे.
Niagara Falls Frozen : देशातील (India) भारतातील अनेक भागांमध्ये (Weather) थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. थंडीच्या लाटेमुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. थंडीचा कहर फक्त भारतातच नाही. तर अमेरिकेतही कडाक्याची थंडी पडली आहे. नाताळच्या दिवशी अमेरिकेमध्ये हिमवादळ (Blizzard) धडकले. शनिवारी आणि रविवारी अमेरिकेतील (America) अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. यामुळे अमेरिकेतील अनेक भाग गोठले. बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. जागोजागी अनेक फूट उंच बर्फाचे डोंगर पाहायला मिळत आहेत. यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अमेरिकेतील तापमान मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रसिद्ध नायगारा धबधबाही (Niagara Falls) गोठला आहे.
जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला
अमेरिकेतील तापमान शून्याखाली मायनिस डिग्रीवर पोहोचले आहे. यामुळे जगप्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठला आहे. नायगारा धबधबा गोठल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा धबधबा जणू आर्क्टिक खंडाचा भाग दिसत आहे, पाणी गोठल्यामुळे येथे फक्त पांरा शुभ्र बर्फ दिसत आहे. अमेरिकेली हिमवादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
The day after the great freeze, my family and I went to #NiagraFalls. The #NiagraRiver below it had ice thick enough for you *to technically* get to #Buffalo, #NewYork by foot!
— Escondido Weather Observer (CoCoRaHs: CA-SD-197) (@KCAESCON230) December 23, 2022
Was it an intriguing and surreal Arctic experience for a kid from California, yes! pic.twitter.com/MAC8IIfjZc
द न्यूयॉर्क पोस्ट (The New York Post) वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, नायगारा धबधब्याचा काही भाग गोठला आहे. हा धबधबा पूर्णपणे गोठलेला नाही. याचा काही भाग गोठला असून. काही भागातून पाणी वाहत आहे. नायगारा धबधब्यातील दर सेकंदाला 3,160 टन पाणी 32 फूट उंचीवरून खाली पडते.
नायगारा धबधब्याचे वैशिष्ट्यं
नायगारा धबधबा (Niagara Falls) जगभरातील सर्वात मोठा आहे. हा धबधबा कोट्यवधी पर्यटकांचे आकर्षण आहे. नायगारा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या हद्दीवर आहे. नायगारा धबधबा न्यू जर्सीपासून सुमारे 400 किमी दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराजवळ आहे. नायगारा धबधब्यावरून प्रत्येक मिनिटाला 40 लाख चौरस फूट पाणी खाली पडते. या अर्थाने हा जगातील सर्वांत मोठा धबधबा आहे.
AFTER A BLIZZARD, NIAGARA FALLS IS OFFICIALLY A WINTER WONDERLAND ❄️💙 pic.twitter.com/1Jjc2xykuL
— Niagara Action (@NiagaraAction) December 28, 2022
अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा
अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. अमेरिकेतील 60 टक्के लोकसंख्या या संकटाशी लढा देत आहे. सगळीकडे फक्त बर्फच बर्फ पसरलेला दिसत आहे. अमेरिकेमध्ये विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. बॉम्ब हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ख्रिसमसच्या सुट्टीपूर्वी अमेरिकेत धडकलेल्या हिमवादळामुळे उत्तर अमेरिकेत थंडी शिगेला पोहोचली आहे. पश्चिम कॅनडातील तापमान -53 अंश सेल्सिअस (-63 F) पर्यंत घसरले आहे. तर, मिनेसोटामध्ये तापमान -38 आणि डॅलसमध्ये -13 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
हिमवादळ म्हणजे काय?
हिमवादळ म्हणजे बर्फाचे वादळ. हिमवादळ ही फार गंभीर हवामानाची स्थिती आहे. यावेळी तापमान मोठ्या प्रमाणात घरसते, जोरदार थंड वारे वाहतात. मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. यामुळे दृश्यमानता कमी होते. याची तीव्रता हवामानानुसार बदलते. मात्र तीव्रता अधिक असेल, तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.