Russia Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? युक्रेन-रशिया सीमेवर मोठ्या हालचाली
Russia Ukraine Conflict : युक्रेन-रशिया सीमेवर मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. युक्रेन सीमेजवळ रशियन सैनिकांची संख्या वाढलेली दिसत आहे. सीमेवर अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे साठवली जात आहेत.
Russia Ukraine Conflict : युक्रेन देशावरील संकट वाढताना पाहायला मिळत आहे. युक्रेन आणि रशियामधील तणावाच्या परिस्थितीचा परिणाम जगभरात झाल्याचा पाहायला मिळतोय. युद्धाच्या भीतीने अनेक देश आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढत आहेत, तर जागतिक बँकेसारख्या काही मोठ्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना तेथून दुसरीकडे हलवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊनही रशिया सहमत नाही. युक्रेनच्या सीमेजवळ रशिया सैन्यबळ वाढवत आहे. त्याचबरोबर हळूहळू अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे येथे जमा होत आहेत. हॉवित्झर, टाक्या, पाणबुड्या तसेच क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक प्राणघातक शस्त्रे यांची सतत तैनाती वाढवली जात आहे.
रशिया युक्रेनकडे आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा
काळ्या समुद्रात रशियाने यापूर्वीच अनेक पाणबुड्या तैनात केल्या आहेत. मैदानी भागातही आधुनिक शस्त्रास्त्रांसह सैनिकांची संख्याही वाढवली जात आहे. युक्रेन सीमेजवळ 100,000 हून अधिक रशियन सैनिक जमले असल्याचा दावा अमेरिकन अधिकारी आधीच करत आहेत. बीजिंग ऑलिम्पिक संपण्यापूर्वी रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा दावाही अमेरिकेने केला होता. अशा परिस्थितीत अमेरिकेने पुन्हा आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. भारतानेही नागरिकांनी युक्रेन देश सोडण्यास सांगितले आहे. इतर अनेक देशही लोकांना तेथे जाण्यास नकार देत आहेत आणि तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथून परतण्याचे आवाहन करत आहेत.
रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता
व्हाईट हाऊसचे उप प्रेस सचिव जीन-पिअरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो. मात्र, गुप्तचर माहितीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की रशिया कोणता मार्ग निवडेल हे स्पष्ट नाही. मात्र, अमेरिका कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले होते. तर, जर्मनी आणि ब्रिटनसारखे देश हे संकट टाळण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Attack On Ukraine : 'उद्या रशिया युक्रेनवर हल्ला करणार', युक्रेनच्या राष्ट्रपतींची फेसबुक पोस्ट
- Ukraine : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेसह अनेक मित्र देश एकत्र, व्हाईट हाऊसचा दावा
- Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ करणार सुनावणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha