Ukraine : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेसह अनेक मित्र देश एकत्र, व्हाईट हाऊसचा दावा
America On Russia-Ukraine Tension : व्हाईट हाऊसचे उप प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन पियरे यांनी सांगितले, स्टेट सेक्रेटरी अँटोनी ब्लिंकन यांनी क्वाड देशांसोबत रशिया-युक्रेन देशांतील तणावावर चर्चा केली.
America On Russia-Ukraine Tensions : युक्रेनच्या मुद्द्यावरून तणाव शिगेला पोहोचला आहे. युक्रेनवरील सध्याचा धोका लक्षात घेता भारतासह इतर अनेक मित्र राष्ट्रांसोबत मिळून काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितले की, रशिया आणि युक्रेनवर हल्ल्याच्या शक्यतेबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अमेरिका भारतासह इतर मित्र राष्ट्रांसोबत एकत्र काम करत आहे. रशियाबाबत क्वाडच्या एकमताने घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारले असता, व्हाईट हाऊसचे उप प्रेस सचिव करीन जीन-पिअरे म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी रशिया आणि युक्रेनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यातील वाढलेल्या तणावावर चर्चा केली. जीन-पिअरे म्हणाले की, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी देखील रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला असलेल्या असलेल्या धोक्यासंदर्भात चर्चा केली.
'युक्रेन संकटावर भारत आणि मित्र राष्ट्रांसोबत काम करत आहोत'
जीन-पिअरे यांनी पुढे सांगितले की, क्वाड सदस्यांसोबतच्या बैठकीदरम्यान अँटनी ब्लिंकन यांनी युरोपीय मित्र देशांना पाठिंबा देण्याच्या आमच्या तयारीच्या आधारे आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि रशिया याविषयी आपले मत व्यक्त केले. समोर येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली. क्वाडमध्ये भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना उप प्रेस सचिव म्हणाले की, 'आम्ही धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवू. यामध्ये अमेरिका आणि भारत दक्षिण आशियातील स्थिरता वाढवण्यासाठी एकत्र काम करतील. आमचे आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यासाठी आणि स्वतंत्र इंडो पॅसिफिकमध्ये योगदान देण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रात भारत हा समविचारी भागीदार आणि नेता आहे हे आम्हांला माहित आहे.'
युक्रेनवर लवकरच हल्ला होण्याची भीती
रशियावरील निर्बंधांबाबत ते म्हणाले की, विशिष्ट गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत न करता आम्ही भारतासह अनेक महत्त्वाच्या भागीदारांसोबत याविषयावर काम करत आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सहा नेते, नाटो आणि युरोपीय संघाचे प्रमुख यांच्याशी महत्त्वाची बैठकही पार पडली. पाश्चिमात्य देश आणि रशिया यांच्यातील तणाव कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
रशिया-युक्रेनमध्ये तणाव कायम
रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ 100,000 हून अधिक सैनिक एकत्र केले आहेत. अमेरिका आणि नाटो सहयोगी देशांच्यावतीने चिंता व्यक्त करताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही अनेकदा इशारा देण्यात आला आहे. तरीही, रशिया युक्रेन सीमेजवळून आपले सैन्य मागे घेण्यास तयार नाही. रशिया लवकरच युक्रेनवर आक्रमण करू शकतो, असा अमेरिकेचा दावा आहे. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हा दावा फेटाळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट ओसरली; गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित
- Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ करणार सुनावणी
- Viral Video : विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha