Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ देणार निकाल
Hijab Controversy : कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुलींना वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले, त्यानंतर या प्रकरणाने पेट घेतला आणि आता यावरून वाद वाढत आहे.
![Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ देणार निकाल karnataka hijab controversy high court hearing today High court 3 member bench will make decision Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ देणार निकाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/21f1d8f1b8b8ac52b865f12ebcd7f9d2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात दुपारी 2.30 वाजता सुनावणी सुरू होईल. याआधी सोमवारी न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती दीक्षित यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सरकार मूलभूत अधिकारांवर बंधने घालू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सांगितले की, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीकडे (CDC) गणवेशावर नियम तयार करण्यासाठी कोणताही कायदेशीर वैधानिक आधार नाही. हिजाब घालणे ही इस्लामी धर्माची अनिवार्य प्रथा आहे. जोपर्यंत मुख्य धार्मिक प्रथा संबंधित आहेत, त्या अनुच्छेद 25(1) मध्ये समाविष्ट आहेत.
सुनावणीदरम्यान, एका वकिलाने या मुद्द्यावर मीडिया आणि सोशल मीडियावरील टिप्पण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अर्जाचा संदर्भ दिला आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका होईपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलण्यात यावे. त्यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोगाने किंवा काही अधिकाऱ्यांनी ही विनंती केल्यास आपण त्यावर विचार करू शकतो.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण उडुपी येथील एका महाविद्यालयापासून सुरू झाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सहा मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागातही पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
- 'भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार'; संजय राऊतांचा इशारा, उद्या पत्रकार परिषद
- Viral Video : विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)