एक्स्प्लोर
Advertisement
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाचा दणका, प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली
किंगफिशर एअरलाईन्स’च्या नावे घेतलेलं बँकांचं सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे.
लंडन : कर्जबुडवा उद्योजक विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडन कोर्टाने विजय मल्ल्याची भारतात प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. इंग्लंड सरकार लवकरच मल्ल्याला भारताकडे सोपवू शकतं.
काही दिवसांपूर्वीचं मल्ल्याला मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टाने 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित केलं आहे.
किंगफिशर एअरलाईन्स’च्या नावे घेतलेलं बँकांचं सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते.
विजय मल्ल्याची श्रीमंत 'गरिबी', पत्नीच्या पैशांवर उदरनिर्वाह सुरु, बँक खाती न गोठवण्याची विनंती
ब्रिटनचे गृहसचिव साजिद जाविद यांनी कर्जबुलव्या विजय मल्लाच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली होती. यूके सरकारच्या या निर्णयाविरोधात मल्ल्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. प्रत्यार्पणविरोधी याचिका दाखल करुन मल्ल्याचा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न होता. परंतु लंडन कोर्टाने याचिका फेटाळत त्याचे मनसुबे उधळले.विजय मल्ल्यावर 16 बँकांच 9000 कोटींच कर्ज
- स्टेट बँक ऑफ इंडिया - 1600 कोटी
- पंजाब नॅशनल बँक - 800 कोटी
- आईडीबीआई बँक - 800 कोटी
- बँक ऑफ इंडिया - 650 करोड़
- बँक ऑफ बडोदा - 550 कोटी
- यूनाइटेड बँक ऑफ इंडिया - 430 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी
- यूको बँक - 320 कोटी
- कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया - 310 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ मैसूर - 150 कोटी
- इंडियन ओवरसीज़ बँक - 140 कोटी
- फेडरल बँक - 90 कोटी
- पंजाब सिंध बँक - 60 कोटी
- एक्सिस बँक - 50 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement