(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार, बाधितांची संख्या 336वर, प्रशासन हायअलर्टवर
Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. याबाबत ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी ओमायक्रॉनचं संक्रमण वाढल्याची माहिती दिली आहे.
Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. याबाबत ब्रिटनचे (Britain) आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी ओमायक्रॉनचं संक्रमण वाढल्याची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी सोमवारी संसदेत सांगितले की, ओमायक्रॉन या कोरोना व्हेरियंटचे नवीन स्वरूप देशातील अनेक भागात वेगाने पसरू लागले आहे. जावेद यांनी 'हाऊस ऑफ कॉमन्स' म्हणजेच ब्रिटनच्या संसदेमध्ये सांगितले की, ''ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या प्रकारच्या व्हेरियंटची एकूण 336 रुग्ण आढळून आले आहेत.''
ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी पुढे सांगितले की, ''ब्रिटनमधील ओमायक्रॉनचे नवे 71 रुग्ण स्कॉटलंडमध्ये सापडले असून वेल्समध्येही 4 बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाशी काहीही संबंध नाही. या वाढलेल्या आकडेवारीवरुन ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाल्याचा आढळलं आहे.''
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनानं सतर्कतेची पाऊलं उचलली आहेत. नवे रुग्ण आढळलेल्या भागात आणि आसपासच्या ठिकाणी जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. ब्रिटनच्या पूर्व, लंडन, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम आणि पूर्व आणि पश्चिम मिडलँड्समध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत.
वेल्समध्ये सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
ब्रिटनच्या वेल्समध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. वेल्स सरकारने सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सुरुवातीला कार्डिफ आणि वेले युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्ड परिसरात सापडले होते. या बाधितांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. दरम्यान, शुक्रवारी स्कॉटलंडमध्ये आणखी 16 रुग्ण आढळून आले. त्यानंतर देशातील एकूण 29 लोक या नवीन प्रकाराचे बळी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Cases In Mumbai : मुंबईचं टेन्शन वाढलं, ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले
- Omicron Variant : राज्य सरकारची प्रवाशांसाठी नवीन कठोर नियमावली
- Worli Gas Cylinder Explosion : चार महिन्याच्या बालकाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनीही सोडला जीव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha