Omicron Variant : राज्य सरकारची प्रवाशांसाठी नवीन कठोर नियमावली
Omicron Variant guidelines : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. डोंबिवली, पुणे आणि मुंबईमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
![Omicron Variant : राज्य सरकारची प्रवाशांसाठी नवीन कठोर नियमावली Omicron Variant maharashtra government fresh guidelines for international arrivals Omicron Variant : राज्य सरकारची प्रवाशांसाठी नवीन कठोर नियमावली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/04/5c29fc280a85e55a116d88f7369690a0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron Variant guidelines : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. डोंबिवली, पुणे आणि मुंबईमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटबाधित रुग्णांची संख्या 10 झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णाची वाढती संख्या पाहाता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारने प्रवाशांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारकडून दक्षिण आफ्रिकासह 11 देशांना हाय रिस्कमध्ये ठेवलं आहे. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे.
काय आहे नियमावलीमध्ये -
30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नियमांवलीमध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे. 30 नोव्हेंबर रोजी दोन देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आलं होतं. याची संख्या आता 11 करण्यात आली आहे.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर या चाचणीमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला तर सक्तीचं क्वारंटनाई करण्यात आलं आहे. तसेच संबधित नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील. निगेटिव्ह येईपर्यंत सर्व नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील.
प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आली तर सात दिवसांचं होम विलगीकरण करण्यात येईल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी कऱण्यात येईल. जर निगेटिव्ह रिपोर्ट आला तर पुढील सात दिवस होम क्वारटाईन व्हावं लागेलं.
हाय रिस्क देशाची यादी -
1. युरोप आणि युके
2. दक्षिण आफ्रिका
3. ब्राझिल
4. बोत्सवाना
5. मॉरिशिअस
6. न्यूझीलंड
7. सिंगापूर
8. हाँगकाँग
9. झिम्बॉबे
10. इस्राइल
11. चीन
परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. एअरपोर्ट प्रशासनाकडून २४ वॉर्डातील वॉर रूम्सना प्रवाशांची माहिती दिली जाणार आहे. प्रवाशांना ७ दिवस विलिनीकरण बंधनकारक करण्यात आलंय. वॉर रुमकडून प्रत्येक वॉर्डात १० रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी राहत असलेल्या सोसायटीला पत्र दिलं जाणार आहे...प्रवासी विलगीकरणाचे नियम पाळतो की नाही यावर पालिकेचं बारीक लक्ष असणार आहे.
राज्यातील रुग्णाची संख्या दहा -
शनिवारी डोंबविलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक रुग्ण आढळला. आज मुंबईत दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या दहावर पोहचली आहे.
एकाच कुटुंबातील सहा रुग्ण –
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉन –
पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता. 29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)